- ऋजुता लुकतुके
देशातील शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबीने डिमॅट खात्यात (Demat Nomination) नामांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत तुम्हीली डिमॅट खातं तुमच्या मागे कुणाला मिळणार हे ठरवू शकता. किंवा नामांकन प्रक्रिया करणार नसल्याचं जाहीर करू शकता, पण, यापैकी काही न केल्यास नवीन वर्षांत तुमच्या डिमॅट खात्यात तुम्ही व्यवहार करू शकणार नाही. नामांकनासाठी आधीची मुदत ३० सप्टेंबर होती. नंतर ती ३ महिन्यांनी वाढवण्यात आली. आता डिमॅट खात्यासाठी ही मुदत १ जानेवारी २०२४ असल्याचं सेबीनं जाहीर केलं आहे.
याखेरीज इतरही काही मुदती डिसेंबरमध्ये संपत आहेत. त्यावरही एक नजर टाकूया, बँक लॉकर सुविधेचा नवीन करार : तुम्ही बँकेकडून लॉकर सुविधा घेतली असेल तर लॉकर घेतलेल्या बँकेबरोबर सुधारित करार करणं रिझर्व्ह बँकेनं अनिवार्य केलं आहे. कारण, लॉकरचे काही नियम आता बदलले आहेत. हा सुधारित करार केला नाही, तर तुमचा लॉकर आणि त्यातील वस्तू या गोठवल्या जाऊ शकतात. लॉकरचा सुधारित करार पूर्ण करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२३ अशी आहे.
(हेही वाचा – Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आणि कल्व्हर्टचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट)
आधार कार्डात करायचे बदल : तुम्हाला आधार कार्डातील कुठलीही माहिती ऑनलाईन बदलायची असेल तर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तुम्ही ती मोफत बदलू शकता. त्यानंतर ऑनलाईन केलेल्या बदलांसाठीही ५० रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे.
सिम-कार्डासाठी केवायसी प्रक्रियेत बदल :
तुम्हाला मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी आता केवायसी फॉर्म भरून द्यावा लागणार नाही. दूरसंचार मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२३ नंतर केवायसी नियम बदलला आहे. त्यानुसार, नवीन सिम कार्ड घेताना ग्राहकांना केवायसी प्रक्रिया ऑनलाईन करता येईल. ती कागदोपत्री करण्याचा त्रास आता वाचणार आहे.
कॅनडात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँक बॅलन्स मर्यादा वाढली :
कॅनडाला शिक्षण घेण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आता पूर्वीपेक्षा दुप्पट बँक बॅलन्स दाखवावा लागणार आहे. तिथे राहण्याचा खर्च वाढला असल्याचं सांगत कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने ही मर्यादा पूर्वीच्या २०,००० अमेरिकन डॉलर ऐवजी आता २०,६३५ अमेरिकन डॉलरपर्यंत वाढवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community