Democracy Day : ‘म्हाडा’त संजीव जयस्वाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या

736
Democracy Day : 'म्हाडा'त संजीव जयस्वाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) चौथा लोकशाही दिन सोमवारी पार पडला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकशाही दिनात प्राप्त १३ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अर्जदारांच्या अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या लोकशाही दिनात प्राप्त व स्वीकारलेल्या तेरा निवेदन तथा अर्जांपैकी सहा अर्ज मुंबई मंडळाशी, चार अर्ज मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाशी व तीन अर्ज कोंकण मंडळाशी संबंधित होते. (Democracy Day)

आयोजित लोकशाही दिनात अर्जदार वलेरियन मथियास यांनी अर्जाद्वारे केलेली मागणी मान्य करीत मथियास वास्तव्यास असलेल्या जेकब इमारतीत मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे खिडकी दुरूस्ती व घरासमोरील व्हरांड्यावर पत्रा टाकून देण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अर्जदार अरविंद अदाटे व गोविंद करवा यांनी म्हाडा कोकण मंडळातर्फे जाहीर सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील हायलंड स्प्रिंग या योजनेत विजेत्या पात्र अर्जदारांकडून संबंधित विकासक वाढीव किंमतीची मागणी करीत असून त्याबाबत व इतर मुद्द्यांबाबत लक्ष घालण्याची मागणी केली. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी संबंधित विकासकाबरोबर पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Democracy Day)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : मुष्टीयुद्धात निखत आणि लवलिनचा आधार)

अर्जदार किशोर शिंदे यांनी खेरनगर नंदादीप गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाबाबत केलेल्या तक्रारीबाबत संबंधित उपनिबंधक यांनी अर्जदारांनी मागणी केलेल्या सर्व मुद्द्यांची नोंद घेऊन सुनावणी घेण्याचे तसेच या इमारतीच्या स्वयं पुनर्विकासासाठी सभासदांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी बैठक घेण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Democracy Day)

अर्जदार दिनेश पांडे यांच्या मालवणी मालाड योजना संकेत क्रमांक-१५९ मधील सदनिका नियमितीकरणाची मागणी मान्य करीत येत्या १० दिवसात सदनिका नियमितीकरण करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. अर्जदार प्रसाद कांदळकर यांच्या उन्नतनगर गोरेगांव येथील भूखंडावर शाळेचे आरक्षण असल्याने अभिहस्तांतरण करण्यासाठी येणाऱ्या अडचणीं संदर्भात सहमुख्य अधिकारी, मुंबई मंडळ व निवासी कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर बैठक घ्यावी तसेच या भूखंडावरील शाळेच्या आरक्षणाबाबत महानगपालिकेला प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले. (Democracy Day)

(हेही वाचा – Rohit Sharma : कुटुंबीयांबरोबर सुट्टीवर असलेल्या रोहितचा सूचक संदेश)

अर्जदार संदीप बुरकुल यांच्या अर्जाबाबत जयस्वाल यांनी जुनी एमएचबी कॉलनी बोरीवली पश्चिम येथील म्हाडा भूखंडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची कार्यवाही येत्या ०१ ऑगस्टला करावी, असे निर्देश दिले. तसेच या भूखंड शाळेसाठी आरक्षित ठेवण्याबाबत महानगरपालिकेला पत्र पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या प्राप्त निवेदन अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या १५ दिवसांत देण्याचे निर्देशही श्री. जयस्वाल यांनी दिले. (Democracy Day)

तीन लोकशाही ४१ पैकी ४० अर्ज निकाली

दि. ०८ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या पहिल्या लोकशाही दिनानिमित्त प्राप्त १५ अर्ज व १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या दुसऱ्या लोकशाही दिनात प्राप्त १६ अर्ज व ११ मार्च, २०२४ रोजी झालेल्या तिसऱ्या लोकशाही दिनात प्राप्त १० अर्ज प्रकरणी अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत कार्यवाही करण्यात आली आहे. आजतागायत तिन्ही लोकशाही दिन मिळून ४१ अर्ज प्राप्त झाले असून ४० अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ०१ अर्ज प्रलंबित असून ५ अर्ज इतर शासकीय आस्थापनांशी निगडीत असल्याने त्यांच्याकडे उचित कार्यवाहीसाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत. (Democracy Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.