MNS : लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती, मनसेने करून दिली आठवण

विधीमंडळाचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाबाबत दिलेल्या निकालावर मनसेची प्रतिक्रिया आता बाहेर येऊ लागली आहे. मनसे नेते शिरीष सावंत यांनी मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यानंतर शिवसेनेने मांडलेल्या भूमिकेची आठवण करून देत कालाय तस्मै नम: असे म्हटले आहे.

1336
MNS : लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती, मनसेने करून दिली आठवण
MNS : लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती, मनसेने करून दिली आठवण

विधीमंडळाचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना पक्षाबाबत दिलेल्या निकालावर मनसेची प्रतिक्रिया आता बाहेर येऊ लागली आहे. मनसे नेते शिरीष सावंत यांनी मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यानंतर शिवसेनेने मांडलेल्या भूमिकेची आठवण करून देत कालाय तस्मै नम: असे म्हटले आहे. (MNS)

एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख असलेल्या शिवसेना (उबाठा) यांच्याबाबत निकाल देताना विधीमंडळाचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे. पक्ष आणि चिन्हही त्यांचेच आहे, असा निकाल दिला. या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असल्या तरी मनसेच्यावतीने मात्र या प्रतिक्रिया उशिराने यायला लागल्या. त्यामुळे याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष आहे. (MNS)

(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : वंचितला आघांडीत घेणे काँग्रेसची मजबूरी)

सत्तेचा वापर करत निर्णयात बदल

मात्र, तत्पूर्वी मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी समाजमाध्यमाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यात त्यांनी न्यायाची भाषा करणाऱ्या उबाठा गटाने सत्तेच्या उन्मादामध्ये मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यावर विभागीय आयुक्तांसमोर केलेला सुनावणीचा फार्स आठवावा. लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती. कालाय तस्मै नम: सन २०१७च्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु निवडणुकीनंतर काही दिवसांतच या सात पैंकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने या सहा नगरसेवकांना पळवल्यानंतर विभागीय कोकण आयुक्तांकडे मनसेने तक्रार केली होती. त्यावेळी कोकण आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये सत्तेचा वापर करत याचा निर्णय बदलण्यात आला होता. (MNS)

त्यामुळे या सहा नगरसेवकांची नोंद शिवसेनेने आपल्यात करून घेत आपली सदस्य संख्या वाढवली. त्यामुळे मनसेकडे संजय तुर्डे यांच्या रुपात एकमेव नगरसेवक उरला होता. मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यानंतर माजी मंत्री व शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसेचा उल्लेख संपलेला पक्ष असा केला होता आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांना संपलेल्या पक्षाचे नेते असे म्हटले होते. त्यामुळे आधी शिवसेनेने सहा नगरसेवक पळवले आणि त्यानंतर संपलेला पक्ष अशा उल्लेख केल्याने हा अपमान मनसेच्या आणि मनसेच्या प्रत्येक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे विधीमंडळाचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिल्यानंतर मनसेच्या प्रतिक्रियेकडे लक्ष असताना शिरीष सावंत यांनी समाज माध्यमावर आपले मत मांडून एकप्रकारे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला लोकशाहीची आठवण करून दिली आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.