पवईतील ‘त्या’ सायकल ट्रॅकचे बांधकाम तोडण्यासाठी कंपनीची निवड; ७६ लाख होणार खर्च

106

पवई तलावाच्या काठावर उभारलेल्या अनधिकृत सायकल ट्रॅकचे बांधकाम हटवून टाकण्यासाठी अखेर कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. हे अनधिकृत सायकल ट्रॅकचे बांधकाम हटवण्यासाठी विविध करांसह सुमारे ७६ लाख खर्च केला जाणार आहे. या सायकल ट्रॅकचे बांधकाम हटवण्यासाठी मेसर्स इनफायनाईट दी टोटल सोल्यूशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

जागा पूर्ववत करण्याचे निर्देश 

पवई तलाव परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेऊन महापालिकेने मे-२०२१ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यासाठी सुमारे ८०६ मीटर लांबीचे गॅबियन तंत्रज्ञान आधारीत सायकल मार्गिका/पदपथाचे काम पवई तलावाच्या परिघाभोवती वेगवेगळ्या भागात अंशत: करण्यात आले होते. हे काम प्रगतीपथावर असतांना ओमकार सुपेकर तसेच ‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेने या प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. या दोन जनहित याचिकेवरील सुनावणी अंती उच्च न्यायलाय मुंबई यांनी ०६ मे २०२२ रोजीच्या आदेशामध्ये हे नविन तंत्रज्ञान आधारीत सायकल मार्गिका तथा पदपथाचे अंशतः काम पूर्णपणे काढून टाकून ही जागा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना सुनावले)

त्यानुसार महापालिकेने सायकल ट्रॅकचे बांधकाम हटवण्यासाठी ६६ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये २२.९९ टक्के कमी बोली लावत हे काम ६२ लाख ४३ हजार रुपयांच्या कामासाठी मेसर्स इनफायनाईट दी टोटल सोल्यूशन ही कंपनी पात्र ठरली आहे. तर विविध करांसह ही रक्कम ७६ लाख १७ हजार एवढी आहे. हे काम पुढील चार महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिवळा टिपके असलेला पट्टा : १०० मीटर लांब

  • नारंगी रंग पट्टा : ५६६ मीटर लांब
  • लाल रंग प ट्टा : १४० मीटर लांब
  • एकूण ८०६ मीटर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.