Dengue Vaccine: डेंग्यूची लस पुढील वर्षी भारतात येणार, तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू

147
Dengue vaccine: डेंग्यूची लस पुढील वर्षी भारतात येणार, तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू
Dengue vaccine: डेंग्यूची लस पुढील वर्षी भारतात येणार, तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू

डेंग्यूची लस (Dengue vaccine) पुढील वर्षी भारतात येणार आहे, या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतात डेंग्यूच्या लसीवर चार कंपन्या चाचण्या घेत आहेत. दरम्यान ही लस बाजारात आल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही लस लागू झाल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा (Apurva Chandra) यांनी राज्यांशी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ते म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे (Dengue Patients) जास्त रुग्ण आढळून येत आहेत. (Dengue vaccine)

आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले की, त्यांनी डेंग्यूबाबत राज्यस्तरीय बैठक घेतली आहे. यावेळी प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ते म्हणाले की, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. ऑक्टोबर हा त्याचा सर्वोच्च महिना आहे. प्लेटलेट्सच्या उपस्थितीबाबत सर्व राज्यांशी चर्चा करण्यात आली आहे. ते म्हणाले की, 2000 पर्यंत डेंग्यूमुळे मृत्यूचे प्रमाण 3 टक्के होते ते आता 1 टक्के आहे.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकावर Shiv Sena पक्षाची भूमिका स्पष्ट, खा. श्रीकांत शिंदे म्हणाले…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या दक्षिण आणि पश्चिम भागात प्रकरणे समोर आली आहेत. तसेच तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. हे लक्षात घेऊन राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑक्टोबर महिना डेंग्यूसाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रकरणे ऑगस्टमध्ये सुरू होतात आणि ऑक्टोबरमध्ये यांची संख्या जास्त होते. नोव्हेंबरमध्ये केसेस कमी होऊ लागतात. मात्र यावेळी संपूर्ण देशात ऑक्टोबरपूर्वीच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. (Dengue vaccine)

(हेही वाचा – RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय)

आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) सचिवांनी सांगितले की, त्यांनी डेंग्यूबाबत राज्यांशी बैठक घेतली आहे. यावेळी प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ते म्हणाले की, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळतात.ऑक्टोबर हा त्याचा सर्वोच्च महिना आहे. तसेच प्लेटलेट्सच्या उपस्थितीबाबत सर्व राज्यांशी चर्चा करण्यात आली आहे.  (Dengue vaccine)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.