मुंबईत पावसाळी आजार वाढत असताना डेंग्यूमुळे ४९ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. याबाबत आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषण समितीकडून पडताळणी होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. रुग्ण महिलेच्या शरीरातील प्लेटलेट्स ३० हजाराहून खाली आल्या होत्या, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
मुंबईत आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात २६४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. पालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत गेस्ट्रोचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्याखालोखाल हिवतापाचे ३५५ आणि डेंग्युबाधित २६४ रुग्णांची नोंद झाली. मात्र या महिलेच्या मृत्यूनंतर पालिका आरोग्य विभाग चांगलेच धास्तावले आहेत. महिलेचा मृत्यू पालिका आरोग्य विभाग संशयित डेंग्यू मृत्यू म्हणून मंगळवारी सायंकाळी जाहीर करेल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
(हेही वाचा Accident : पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; २ पोलिसांचा जागीच मृत्यू)
Join Our WhatsApp Community