उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगरमध्ये (Muzaffarnagar) एका मुस्लिम कुटुंबातील १० सदस्यांनी हिंदू (Hindu) धर्मात घरवापसी केली आहे. दि. ३ एप्रिल रोजी सकाळी बागरा येथील योग साधना यशवीर आश्रमात, स्वामी यशवीर महाराजांनी हवन- यज्ञ करून या मुस्लिम कुटुंबाची हिंदू धर्मात घरवापसी करून घेतली. या कुटुंबाने ५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण आता त्यांनी म्हटले की, इस्लाम स्वीकारणे ही आमची चूक होती. पण आता आम्ही पुर्वजांच्या सनातन हिंदू धर्मात घरवापसी करत आहोत. (Muzaffarnagar)
( हेही वाचा : America – China आणखी तणाव वाढला; अमेरिकेने चिनी नागरिकांसोबत प्रेमसंबंध ठेवण्यावर घातली बंदी)
आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज (Swami Yashveer Maharaj) आणि आचार्य मृगेंद्र ब्रह्मचारी (Acharya Mrigendra Brahmachari) यांनी वैदिक मंत्रांनी मुस्लिम (Muslim) कुटुंबाचे शुद्धीकरण यज्ञ करून घरवापसी करून घेतली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी तूप आणि साहित्याचा नैवेद्य दाखवला. या काळात, कुटुंबातील सर्व १० सदस्यांनी त्यांची इस्लामिक नावे सोडून हिंदू (Hindu) नावे स्वीकारली. कुटुंबाची प्रमुख फेमिदा आता राजकुमारी बनली आहे. त्यांचा मुलगा दिलजान ब्रिजेश कश्यप झाला आहे आणि त्याची पत्नी मेहक कविता झाली आहे. रेश्मा पूजा, पलक सविता, आलिया पायल, सना कुमारी सोनिया, खुशनुमा कुमारी साधना, नातू अरमान अमित कश्यप आणि इस्लाम विक्रम सिंग हे फेमिदा यांच्या नातवंड आहेत. (Muzaffarnagar)
देवबंदच्या कश्यप राजपूत कुटुंबातील एका महिलेने ५० वर्षांपूर्वी एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केले होते, त्यानंतर ती फेमिदा बनली. फेमिदा (Femida) म्हणाली, “मी माझा बहुतेक वेळ माझ्या माहेरी राहत असे. माझ्या सासरच्या लोकांना यावर आक्षेप होता. काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. त्यानंतर, माझ्या सासरच्या लोकांनी मला माहेर सोडून सासरच्या घरी राहण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. ते माझ्या मुलांनाही त्रास देतात. माझी मुले महाराष्ट्रात गेली आहेत. ते सहा महिन्यांतून एकदा येतात. त्यांना मी हिंदू धर्मात राहिल्यानेही अडचण होती. आता मी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे, माझ्यासोबत माझ्या कुटुंबानेही हे पाऊल उचलले आहे.”
फेमिदा (Femida) म्हणाली, “आता माझे नाव राजकुमारी आहे. मी ५० वर्षांपूर्वी एक चूक केली होती. मला भाऊ नव्हता. आम्ही पाच बहिणी होतो, म्हणून मी मजबूर होते. आता मी माझ्या धर्मात परतले आहे. मी खूप आनंदी आहे. ईदनंतर माझ्या सनातन धर्मात परतण्याचा मी संकल्प केला होता. आता ते पूर्ण झाले आहे.” (Muzaffarnagar)
आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज म्हणाले, “देवबंदमधील रहिवासी मुस्लिम कुटुंबातील होते. हे लोक आश्रमात आले आणि म्हणाले की त्यांना इस्लाम सोडून सनातन हिंदू (Hindu) धर्म स्वीकारला आहे. शुद्धी यज्ञाद्वारे ते मोठ्या भक्तीने सनातन धर्मात परतले आहेत. ते कश्यप जातीचे आहेत. काही वर्षांपूर्वी काही कारणास्तव इस्लाम धर्म स्वीकारलेले ५००० मुस्लिम हिंदू धर्मात परत येऊ इच्छितात.”
‘सर्व मुस्लिम पूर्वी हिंदू होते’
स्वामी यशवीर महाराज म्हणाले, “भारतात राहणारे सर्व मुस्लिम पूर्वी हिंदू (Hindu) होते. इस्लामी राजवटीत त्यांच्या पूर्वजांवर अत्याचार झाले. अनेकांनी लोभामुळे सनातन धर्म सोडला. कोणीही आनंदाने किंवा त्याच्या शिकवणींनी प्रभावित होऊन इस्लाम स्वीकारला नाही. आम्ही सर्व धर्मांतरित मुस्लिमांना त्यांच्या पूर्वजांची चूक सुधारण्याचे आवाहन करतो. सर्वांनी सनातन धर्मात परत यावे. आता देशात भीतीचे वातावरण नाही. भाजपा सरकार चांगले काम करत आहे. लाखो आणि कोट्यवधी मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. हिंदू धर्मात येऊ इच्छिणाऱ्या मुस्लिमांचे आम्ही स्वागत करतो.”
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community