मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट, तर पुणे शहरात पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे शहरात (Pune)पुढील तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
पुणे शहरात कमाल तापमानाचा पारा ३९.६ अंशांवर पोहचला आहे, तर किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअसवर आहे. येत्या २४ ते २६ एप्रिल रोजी आकाश निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे, तर २७ ते २९ एप्रिलदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. यादरम्यान कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे. (Weather Department)
(हेही वाचा – Cylinder explosion: सायन कोळीवाडा परिसरात गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू, २ गंभीर जखमी)
राज्यातली अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावतीतही दिवसभर उन्हाचे चटके त्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली. गोंदिया जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतीपिकाला फटका बसला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community