प्रादेशिक हवामान विभागाने (RMC) मंगळवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदियासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Department of Meteorology)
ताशी ५० ते ६० किमी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: शरद पवार गटाला ‘तुतारी’, तर अजित पवार गटाला ‘घड्याळ’, सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश )