Deputy Bmc Commissioner : मुंबई महापालिकेत कंत्राटी उपायुक्त

मुंबई महापालिकेतील उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले हे ३१ जानेवारी २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले.

16589
Deputy Bmc Commissioner : मुंबई महापालिकेत कंत्राटी उपायुक्त
Deputy Bmc Commissioner : मुंबई महापालिकेत कंत्राटी उपायुक्त
विशेष प्रतिनिधी,मुंबई

तत्कालिन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या काळात रस्ते, पूल आणि पर्जन्य वाहिन्यांच्या कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी महापालिकेने उपायुक्त (पायाभूत सुविधा) हे पद निर्माण केले. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामधून उपायुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांवर या पदाचा भार सोपवला जातो. मात्र, महापालिका प्रशासनाचा आणि सरकारचा प्रमुख अभियंता पदावरून उपायुक्त पदावर बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांवरच विश्वास नसल्याने आता हे पदच कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे. अशा प्रकारे कंत्राटी पध्दतीने भरल्या जाणाऱ्या या पदावर उल्हास महाले हे पहिले कंत्राटी उपायुक्त ठरणार आहेत.

तिन्ही विभागांशी समन्वय राखण्यासाठी या पदाची निर्मिती

मुंबई महापालिकेतील उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले हे ३१ जानेवारी २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. महाले हे १ ऑगस्ट २०२२ पासून या पदावर कार्यरत होते. या उपायुक्त (पायाभूत सुविधा) या पदाच्या अखत्यारित प्रमुख अभियंता रस्ते व वाहतूक, प्रमुख अभियंता पूल आणि प्रमुख अभियंता पर्जन्य जलवाहिनी विभाग आदी महत्वाच्या खात्यांची कामे येत आहे. (Deputy Bmc Commissioner)

एकूण ५० ते ६० महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरु

मात्र, सध्या हाती घेतलेल्या ४०० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, गोरेगाव मुलुंड प्रकल्प, वर्सोवा ते मिरा भाईंदर सागरी रस्ता प्रकल्प, तसेच विविध ठिकाणी असलेली यांत्रिकी वाहतूक तळ, कर्नाक, विद्याविहार, विक्रोळी पुलांची बांधकामे, मिठी नदी तसेच दहिसर नदी आदी नद्यांचे पुनर्रज्जीवनाची कामे, अमेरिक तंत्रज्ञानाच्या सहायाने सिवर लाईनला जिओ पॉलिमर लाईनिंग, आदी प्रकारची एकूण ५० ते ६० महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरु आहेत. ही सर्व कामे उपायुक्त (पायाभूत सुविधा) या पदाच्या अखत्यारित येत आहे. (Deputy Bmc Commissioner)

(हेही वाचा – Lok Adalat: न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग वाढण्यासाठी तृतीय पंथीयांचीही लोकअदालतीसाठी निवड)

रिक्तपदी सेवा करार पध्दतीने महाले यांची नियुक्ती

यासर्व प्रकल्पांसाठी ते ४ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिके व रेलवे प्रशासन यांच्याशी समन्वय साधण्याचे काम उपायुक्त (पायाभूत सुविधा) या पदावरील अधिकाऱ्यांच्यावतीने केले जाते. त्यामुळे या पदावरील उल्हास महाले हे सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा अनुभव, ज्ञान आणि प्रकल्पांवरील प्रभूत्व लक्षात घेता तसेच महापालिकेची गरज लक्षात घेता महापालिका प्रशासनाने उल्हास महाले यांना १ फेब्रुवारी २०२४ पासून करार पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. या रिक्तपदी सेवा करार पध्दतीने महाले यांची प्रथमत: १ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून शासनाच्या मंजुरीसाठी याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाले यांच्या कंत्राटी पध्दतीने नियुक्त करण्यास शासनाची मंजुरी प्राप्त झाली असून सोमवारी गोखले पुलाच्या एक मार्गिका लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उल्हास महाले हे उपस्थित होते. (Deputy Bmc Commissioner)

दराडे ठरले होते पहिले उपायुक्त (पायाभूत सुविधा)

महापालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या कामांमध्ये समन्वय राहावा म्हणून उपायुक्त (पायाभूत सुविधा) हे पद निर्माण केले होते आणि संजय दराडे हे पद भुषवणारे पहिले उपायुक्त होते. दराडे यांना तिन्ही विभागांच्या कामकाजाचा अनुभव असल्याने दराडे यांना उपायुक्त पदी बढती मिळताच या तिन्ही विभागांची जबाबदारी सोपवली होती.याला अभियंत्यांच्या संघटनेने आक्षेप नोंदवल्याने महापालिका प्रशासनाला उपायुक्त (पायाभूत सुविधा) हे पद निर्माण करावे लागले होते. (Deputy Bmc Commissioner)

उपायुक्त बनणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय

या पदी महापालिकेतील अभियांत्रिकी संवंर्गातील उपायुक्तपदी बढती मिळणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती होणे आवश्यक असते. परंतु महापालिका प्रशासन आणि सरकार यांचा इतर अभियंत्यांवर विश्वास नसल्याने बढतीमधून भरणारे पद हे करार पध्दतीने भरण्यात येत असल्याने बढतीमधून उपायुक्त बनणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या पदावर भविष्यात कंत्राटी पध्दतीने निवृत्त अधिकाऱ्यांना किंवा बाहेरील व्यक्तींची वर्णी लागण्याचा पायंडाच पडला जाणार आहे, त्यामुळे महापालिकेसाठी हा मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. (Deputy Bmc Commissioner)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.