पुण्यात तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री झालेल्या अपघात प्रकरणी संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (DCM Devendra Fadnavis)
पुण्यातील अपघातात दोन आयटी इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अग्रवालला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुण्यात पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर आरोपी वेदांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण जमावाने चोप देऊन त्यास पोलिसांच्या हवाली केले. मात्र काही तासातच वेदांत अग्रवालला जामीन मंजूर झाल्याने सत्ताधारी पक्ष आणि पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. याची तात्काळ दाखल घेत फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. (DCM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Lok Sabha Election : मुंबई-पुणेकरांनी आदिवासींकडून ‘हे’ जरूर शिकावे)
देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिले पुणे पोलिस आयुक्तांना फोन करुन या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या दिल्या सूचना आहेत. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. (DCM Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community