उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अपघातग्रस्त तरुणाला मदत करून सिद्ध केले ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’

76
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अपघातग्रस्त तरुणाला मदत करून सिद्ध केले 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'
उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अपघातग्रस्त तरुणाला मदत करून सिद्ध केले 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील स्वभावाचा परिचय करून दिला. ठाण्यातील साकेत मैदानात ध्वजवंदन कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंबईकडे येत असताना त्यांनी आपल्या ताफा थांबवत दुचाकी अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत केली. त्यांच्या या तत्परतेमुळे एका जखमी व्यक्तीला तातडीने उपचार मिळाले.

अपघाताची घटना ठाण्यावरून मुंबईला येताना पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपरजवळ घडली. एक दुचाकीस्वार अपघात होऊन गंभीर जखमी झाला होता. ताफ्यातून जात असताना शिंदेंनी ही घटना पाहताच तातडीने ताफा थांबवला आणि गाडीतून उतरून तरुणाची विचारपूस केली. त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे पाहताच त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात पाठवले. जखमी तरुणाला राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आले.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana तील अर्ज अपात्र ठरणार का? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या… )

तरुणाला धीर देत शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “काळजी करू नकोस, तू लवकर बरा होशील.” त्यांच्या या कृतीने ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ बाणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

शिंदे नेहमीच “मी मुख्यमंत्री म्हणजे ‘कॉमन मॅन’ आहे,” असे सांगत असतात. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेली तातडीची मदत करण्याची भूमिका सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या निष्ठेचे प्रतीक बनली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.