मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक विभागीय सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांना विभागाचा नकाश बनवून २४ तास स्वच्छता राखली जावी अशाप्रकारचे निर्देश ०५ सप्टेंबर रोजी आयुक्तांनी दिल्यानंतर आता महापालिकेचे सहायक आयुक्त हे दहा दिवसांनंतर सहायक आयुक्त हे ऑनफिल्ड दिसू लागले आहेत. गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ सर्व २४ विभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ‘सामूहिक स्वच्छता’ उपक्रम राबवून लहान रस्ते, गल्ली आदींमध्ये स्वच्छता केली आणि महापालिकेचे उपायुक्त व सहायक आयुक्त हे ‘ऑन द स्पॉट’ भेटी देत मुख्य रस्ते, हमरस्त्यांसह अगदी गल्लीबोळात जाऊन तेथील दैनंदिन स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करायला सुरुवात केली आहे.
मुंबई महानगरातील प्रमुख परिसरांप्रमाणेच लहान रस्ते, गल्ली, पदपथ आणि सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील घनकचरा व्यवस्थापन विभाग, २४ प्रशासकीय विभाग कार्यालय आणि सर्व संबंधित खात्यांना कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत अशी माहिती उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार, परिमंडळ सह आयुक्त तथा उप आयुक्त, सर्व विभागांचे सहायक आयुक्त दररोज आपापल्या कार्यक्षेत्रात किमान दोन तास पाहणी दौरे करत आहेत. विभागवार दौरे केल्यानंतर पाहणीमध्ये केलेल्या स्वच्छताविषयक सूचनांच्या अनुषंगाने त्याबाबत केलेल्या पूर्ततेची पुनर्तपासणी केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच संबंधित सर्व घटक स्वच्छतेविषयी सतर्कतेने कार्यवाही करीत आहेत.
(हेही वाचा – Government Service Recruitment : शासकीय सेवेत १३८ अधिकारी-कर्मचारी यांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार)
घनकचरा व्यवस्थापन खात्याने गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ रोजी डी विभाग अंतर्गत के. के. मार्ग, गोलपीठा, आर्देशीर मार्ग, आर. एस. निमकर परिसर, ताडदेव सर्कल, नेताजी सुभाषचंद्र रस्ता, डी. बी. रस्ता, केनेडी उड्डाणपूल या ठिकाणी स्वच्छता केली. पी दक्षिण विभागात हायपर सिटी, सिबा रस्ता, आरे चेक नाका, रेमी कंपाऊंड, मिलिंद म्हात्रे रस्ता, केशव गोरे मार्ग, श्रीरंग साबडे मार्ग, जवाहर नगर रस्ता, अशोक नगर तर, एफ दक्षिण विभागामध्ये जेरबाई वाडिया रस्ता, भोईवाडा परिसर, डॉ. वाळिंबे मार्ग, पटेलवाडी परिसर, जेरबाई वाडिया रस्ता, भोईवाडा परिसर, डॉ. ई बोर्जेस मार्ग, सुपारीबाग परिसर, शिवडी छेद रस्ता झोपडपट्टी परिसर, झकेरिया परिसर, महात्मा फुले मार्ग, नायगाव परिसर या विभागात कर्मचाऱयांनी सामुहिकपणे स्वच्छता अभियान राबविले. तसेच मुंबई उपनगरांमध्येही कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी सामूहिकपणे स्वच्छता मोहीम राबविली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community