सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसे ते कोकणातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पहिल्या लाटेत कोकणावर विशेष परिणाम झाला नव्हता, मात्र दुसऱ्या लाटेत कोकणाला कोरोनाचा मोठा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत प्रशासन सतर्क झाले आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात थेट पोलीस उपअधीक्षक सचिन बारी हे स्वतः रस्त्यावर उतरले होते.
सकाळी 11 नंतर बंद म्हणजे बंद!
चिपळूण बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता पोलिस उपाधीक्षक सचिन बारी यांनी ६ एप्रिल, रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बाजारपेठेत पायी चालून पाहणी केली. यावेळी अत्यावश्यक सेवेत नसलेली अनेक दुकाने उघडी दिसली, अशा दुकानदारांना लास्ट वॉर्निंग देण्यात आली. अत्यावश्यक सेवा 11 पर्यंत आणि इतर दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याच्या सक्त सुचना यावेळी करण्यात आल्या. पोलिस उपअधीक्षक सचिन बारी आणि नगर परिषद यांची टीम सकाळीच कारवाई करताना पाहून अनेकांची धावपळ झाली. या टीमने चिपळून बाजारपेठ आणि गोवळकोट रोड येथील दुकानांची ही पाहणी करून कडक सूचना दिल्या.
(हेही वाचा : झोपडपट्टीत तयार होतात कोरोना टेस्ट किट! एफडीएचा छापा! )
चिपळूणमध्ये रुग्ण संख्यत वाढ!
चिपळूण परिसरात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बेड अभावी अनेक रुग्ण दगावत आहेत. अशा परिस्थितीत काही व्यापारी नियम पाळतात, तर काही नियम भंग करतात. कोविड संसर्ग टाळायचा असेल तर शासनाने दिलेले नियम पाळावेच लागतील, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Community