मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) जबलपूर जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या जय बजरंग कुस्तीच्या आखाड्यातील हनुमानाच्या मूर्तीची धर्मांधांकडून विटंबना करण्यात आली आहे. या घटनेनंतर हिंदूंनी (Hindu) आखाड्यात मुस्लिमांना प्रवेश पूर्णपणे निषिद्ध केला असून त्यासंदर्भातील माहिती भींतीवर लिहण्यात आले आहे. त्यानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे. (Hindu Idols)
( हेही वाचा : महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; माहिती व तंत्रज्ञान मंत्री Ashish Shelar यांचे निर्देश)
मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील भगवान हनुमानाच्या आखाड्यात १४ वर्षीय अल्पवयीन कट्टरपंथी तरुणाने प्रवेश केला. त्यानंतर त्याने हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करत पुतळा जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आखाड्यातील व्यायामाच्या वस्तू फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि हिंदू (Hindu) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हिंदू (Hindu) संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी निषेध नोंदवला. (Hindu Idols)
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अल्पवयीन आरोपीला अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे ही सांगितले. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी आखाड्यातील भिंतीवर या कृत्याचा निषेध नोंदवत, हल्लाबोल केला आहे. (Hindu Idols)
दरम्यान याप्रकरणानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली असून परिसरात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर पाटण पोलीस ठाणे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Hindu Idols)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community