चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन टेकडीवरील बुद्ध लेणी असलेल्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. ही घटना उघडकीस येताच बौद्ध बांधव संतप्त झाले आणि त्यांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. मंगळवारी (२ जानेवारी) जिल्ह्यातील काही शहरांत निषेध मोर्चा निघणार आहे.
भद्रावती हे ऐतिहासिक शहर मानले जाते. या शहरातील विजासन टेकडीवर सातवाहन कालिन बुद्ध लेणी आहेत. येथे गौतम बुद्ध आले होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे हे स्थळ बौद्ध बांधवासाठी अतिशय पवित्र आहे. याच टेकडीच्या टोकावर बुद्ध मूर्ती आहे. या बुद्ध मूर्तीची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. घटनेची माहिती मिळताच बौद्ध बांधवांनी विजासन लेणीकडे धाव घेतली. बौद्ध बांधवांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. शहर बंदची हाक दिली.
(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : भारतीय फलंदाजांची दुसऱ्या कसोटीत अशी असेल रणनीती )
शहरातील व्यापाऱ्यांनी भद्रावती बंदचे आवाहन केले. या बंदला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील काही शहरांत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community