पेंग्विननंतरही राणीबागेतील पर्यटकांची संख्या घटली!

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये १२ लाख ७१ हजार २७१ आणि एप्रिल २०१९ ते मार्च २०२०पर्यंत १० लाख ६६ हजार ०३६ पर्यटकांची नोंद झाली आहे. त्यामुळे यातून अपेक्षित उत्पन्न कमी होताना दिसत आहे.

103

भायखळा येथील राणीबागेत पेंग्विन पक्षांचे आगमन झाल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु सुरुवातीला पेंग्विन पाहण्यासाठी होणारी गर्दी आता कालांतराने कमी व्हायला लागली. १७ लाखांपर्यंत गेलेला पर्यटकांचा आकडा आता कमी होवून दहा लाखांच्या घरांमध्ये आला आहे. या त्यामुळे पेंग्विनमुळे पर्यटकांचा आकडा वाढल्याच्या दावा करणाऱ्या प्रशासनाला आता ही आकडेवारीच अडचणीची ठरताना दिसत आहे.

भारतातील पहिले प्राणिसंग्रहालय म्हणून राणीबागेची नोंद

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ८ हम्बोल्ट पेंग्विन २६ जुलै २०१५ मध्ये दाखल झाले. तीन नर आणि ५ मादी पेंग्विन याचा सामावेश आहे. त्यातील आता सात पेंग्विन सध्या असून पेंग्विन असलेले भारतातील पहिले प्राणिसंग्रहालय म्हणून राणीबागेची नोंद झाली आहे. परंतु पेंग्विन पक्षी दाखल झाल्यापासून राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची तसेच त्यातून मिळणाऱ्या महसुलात वाढ झाल्याचा दावा प्रशासनाच्यावतीने केला जात आहे.

एप्रिल २०१९ ते मार्च २०२०पर्यंत १० लाख ६६ हजार ०३६ पर्यटकांची नोंद!

एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ मध्ये १२ लाख ४० हजार ७८२ पर्यटकांनी हजेरी लावली होती. त्यातून ६७ लाख ०३ हजार ४४९ एवढा महसूल प्राप्त झाला होता. त्यानंतर यामध्ये वाढ होऊन एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मध्ये १७ लाख ५७ हजार ०५९ पर्यटकांची नोंद झाली. आणि त्यातून ४ कोटी ३६ लाख ६६ हजार ९९८ एवढा महसूल तिकीट विक्रीतून प्राप्त झाला. याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली आणि त्याबरोबरच तिकीटांच्या दरांमध्येही वाढ झाली होती. ज्यामुळे पर्यटकांच्या वाढीबरोबरच उत्पन्नही लाखांवरून कोटींच्या घरांमध्ये पोहोचले. परंतु त्यानंतर पर्यटकांची संख्या कमी होत आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये १२ लाख ७१ हजार २७१ आणि एप्रिल २०१९ ते मार्च २०२०पर्यंत १० लाख ६६ हजार ०३६ पर्यटकांची नोंद झाली आहे. त्यामुळे यातून अपेक्षित उत्पन्न कमी होताना दिसत आहे.

(हेही वाचा : मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी – मुख्यमंत्री)

हायवेला पेंग्विनचे ऑक्सिजन

मागील काही दिवसांपासून पेंग्विन पक्षी आणि कक्षाची तीन वर्षांची देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदेची जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये महापालिकेने तीन वर्षांकरता १५ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित धरला आहे. यावरून जोरदार वातावरण तापलेले असले तरी याच कामांसाठी तिसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दीड महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयाच्यावतीने प्रथम निविदा मागवली होती. त्यामध्ये केवळ एकमेव निविदाकार आला होता. त्यानंतर याची फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये एकाही निविदाकाराने भाग घेतला नाही. त्यानंतर आता तिसऱ्यांदा मागवलेल्या निविदेमध्येही हाय वे कंस्ट्रक्शन एकमेव कंपनीने भाग घेतला आहे. त्यामुळे एकमेव कंपनीने भाग घेतल्यामुळे आता याच कंपनीला काम दिले जाणार असून या पिंजऱ्यांचे काम याच कंपनीने केले होते. ही कंपनी आता याच्या देखभालीसाठी पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे झाल्यास हायवेला पेंग्विनचे ऑक्सिजन मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच हाय वे कंपनीला ऑक्सिजन प्लांटचे काम करण्यासाठी दोन कंपन्यांना अपात्र ठरवून त्यांच्या झोळीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम टाकले होते. त्यामुळे हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीची महापालिका विशेष काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

मागील सहा वर्षांमधील पर्यटक आणि तिकीट विक्रीतून मिळणारा महसूल

  • एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ : १२,४०,७८२ पर्यटक (महसूल : ६७,०३,४४९)
  • एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ : १२,५१,१४९ पर्यटक (महसूल : ६७,०३,४४९)
  • एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ : १३,८०,२७१ पर्यटक (महसूल : ७३,६५,४६४)
  • एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ :१७,५७ ,०५९ पर्यटक (महसूल४,३६,६६ ९९८)
  • एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ : १२,७१, २७१ पर्यटक (महसूल ५,४२,४६,३५३)
  • एप्रिल २०१९ ते मार्च २०२० : १०, ६६, ०३६ पर्यटक (महसूल ४,५७,४६,१५९)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.