डोळे नसूनही ही १३ वर्षांची मुलगी पियानो वाजवून रसिकांना करते बेधुंद

एका १३ वर्षांच्या मुलीने जगभरातील लोकांना पुन्हा एकदा नव्याने विचार करायला लावलं आहे. आपण डोळे असून जे पाहू शकत नाही, ते ही मुलगी अंध असूनही पाहू शकते. ती आपल्या डोळ्यांनी जग पाहू शकत नाही, मात्र तिला सूरांची भाषा कळते. ट्विटरवर या मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ती पियानो वाजवताना दिसतेय.

हा व्हिडिओ ट्विटरवर रेक्स चॅम्पमॅनने शेअर केला आहे. रेक्सने केलेल्या या ट्विटनुसार या मुलीचं नाव आहे लूसी. ती न्यूरोडायव्हर्स संबंधित अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. ती पाहू शकत नाही. मात्र पियानोवर तिची बाटे जादूगारासारखी फिरतात आणि तिच्या संगीताच्या तालावर आपण मंत्रमुग्ध होतो.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील जेवणाचे २.३८ कोटी बिल; चहात सोन्याचे पाणी घालता का?; अजित पवारांचा खोचक सवाल)

लूसी Chopin या महान पॉलिश संगीतकाराचं संगीत पियानोवर वाजवताना दिसतेय. असं म्हटलं जातं की ही धून खूपच कठीण आहे. या १३ वर्षीय लहान मुलीची कलाकारी पाहून इंटरनेट वापरकर्त्यांनी तिच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे. कलाकार तिथे उपस्थित असतो, तोच रंगमंच होऊन जातो, हे वाक्य लूसीसाठी अगदी चपखल बसतं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here