मुंबईत चाचण्यांची संख्या वाढूनही नवीन रुग्ण संख्या घटतेय!

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७२१ दिवस एवढा आहे!

मुंबईतील कोविड रुग्णांचा आकडा आता कमी होत चालला असून मंगळवारी, २९ जून रोजी दिवसभरात ५६२ रुग्ण आढळून आले आहे. विशेष म्हणजे मंगळवारी ३१ हजार ७६९ कोविड चाचणी करण्यात आल्या होत्या. तर दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला.

मंगळवारी ५६२ नवीन रुग्ण आढळून आले!

मुंबईमध्ये सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण अर्थात सक्रीय रुग्णांची संख्या ही ८ हजार ३७१ एवढी आहे. त्यामुळे सक्रीय रुग्ण आणि नवीन आढळून येणारे रुग्ण यांची संख्या कमी होत असल्याने आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. ती मुंबई लेव्हल तीनमधून दोनमध्ये येण्याची. तर दिवसभरात एकूण ६२९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सोमवारी जिथे रुग्णांची संख्या ६०८ एवढी होती, तिथे मंगळवारी ५६२ नवीन रुग्ण आढळून आले. मात्र, सोमवारी कोविड चाचण्यांची संख्या कमी असतानाही जास्त रुग्ण आढळून आले होते, तर मंगळवारी चाचण्यांचे प्रमाण अधिक असूनही त्यातुलनेत कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

(हेही वाचाः स्थायी समितीने दिलेल्या अधिकाराचा प्रशासनाकडून आजही वापर)

रुग्ण दुप्पटीचा दर हा ७२१ दिवस एवढा आहे!

दिवसभरात झालेल्या १२ रुग्णांच्या मृत्यूपैंकी ११ रुग्ण हे दीर्घकालीन आजार असलेल्यांपैकी होते. तर यामध्ये ७ रुग्ण हे पुरुष तर ५ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ८ रुग्ण हे ६० वर्षांवरील होते, तर उर्वरीत ४ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर हा ७२१ दिवस एवढा आहे. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण असले तरी सक्रीय कंटेन्मेंट असलेल्या झोपडपट्टी  व चाळींची संख्या १० एवढी आहे, तर सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या ७९ एवढी आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here