तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की आता कोणत्याही प्रकारचा शोध लागू शकतो. पुढारलेल्या तंत्रज्ञानामुळे संशोधक दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील असे नवीन शोध तर लावतंच आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर देखील शोध लागत आहे. आता संशोधकांनी जो शोध लावला आहे, त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.
चित्रपटात विशेषतः हॉलिवूडपटात आपल्याला अनेक काल्पनिक तंत्रज्ञान पाहायला मिळतं. आता वैज्ञानिकांनी अद्भूत गोष्ट निर्माण केली आहे. यामुळे हेरगिरी करण्यासाठी मदत होणार आहे. पोलिसांना आणि सैनिकांना शोध मोहिम राबवण्यासाठी कुत्रे कामाला येतात. आता यामध्ये झुरळांची भर पडणार आहे.
तुम्ही जे ऐकताय ते नवल असलं तरी सत्य आहे वाचकांनो. वैज्ञानिकांनी साईबोर्ग कॉकरोच आय आणि जीव यांचं एक अद्भूत संयोजन निर्माण केलं आहे. या तंत्रज्ञानाने कोणत्याही जीवांवर नियंत्रण करुन त्यांच्याकडून तुहवे ते काम काढून घेता येणार आहे. झुरळाच्या पाठीवर सोलार पॅनल आणि दुसरे उपकरण लावून त्या जीवालावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
(हेही वाचा राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे; चीनचे कौतुक आणि काश्मीरबाबतही केले चुकीचे विधान)
या तंत्रज्ञानाचा वापर हेरगिरी आणि सुरक्षा यंत्रणेसाठी करता येऊ शकतो. जापान हे राष्ट्र यावर गांभिर्याने काम करत आहे. मेडागास्कर कॉकरोच या झुरळांच्या प्रजातीचा या तंत्रज्ञानासाठी वापर केला जातो. या झुरळांचे वैशिष्ट्य असे असते की हे झुरळ उलटे झाले की ते स्वतःहून सरळ होते. दुसरी गोष्ट म्हणजे हे झुरळ त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलू शकतात.
याच वैशिष्ट्यांमुळे त्यांचा या तंत्रज्ञानासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यांच्या पाठीवर चिप्स किंवा सोलार पॅलन लावल्यानंतरही ते पुढे जाऊ शकतात. आता वैज्ञानिक या झुरळांच्या पाठीवर कॅमेरा आणि सेंसर लावण्याचा विचार देखील करत आहेत. जर हे संशोधन यशस्वी झालं तर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये या झुरळांचा वापर होऊ शकते. मात्र एक अडचण अशी आहे की, प्राणीप्रेमी या तंत्रज्ञानाचा विरोध करत आहेत. कारण एखाद्या जीवावर नियंत्रण मिळवून त्याला आपल्या मनाजोगे काम करायला लावणे हा त्या जीवावर अत्याचार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.