Development Of Pilgrimage Sites: राज्यातील तीर्थक्षेत्रांचे रूपडे पालटणार, ग्रामविकास विभागातर्फे 2,400 कोटी रुपयांची योजना

विकासकामात पारदर्शकता आणण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा लक्ष देणार

135
Development Of Pilgrimage sites: राज्यातील तीर्थक्षेत्रांचे रूपडे पालटणार, ग्रामविकास विभागातर्फे 2,400 कोटी रुपयांची योजना
Development Of Pilgrimage sites: राज्यातील तीर्थक्षेत्रांचे रूपडे पालटणार, ग्रामविकास विभागातर्फे 2,400 कोटी रुपयांची योजना

राज्यातील 480 तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची योजना ग्रामविकास विभागातर्फे राबवली जाणार आहे. यासाठी 2,400 कोटी रुपये खर्चाची योजना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे.

‘ब’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी 5 कोटी रुपये देण्यात येतील.या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ‘ब’ दर्जाच्या तीर्थक्षेत्रांना आतापर्यंत 2 कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. आता त्यात अडीच पट वाढ केली जाणार आहे. विकासकामात पारदर्शकता आणण्याकरिता स्वतंत्र यंत्रणेचीही सोय करण्यात येणर आहे.

(हेही वाचा – G-20 Summit : जी-20 शिखर परिषदेला दिल्लीत सुरुवात, पंतप्रधानांनी सर्व राष्ट्रप्रमुखांचे केले स्वागत)

‘अ’ दर्जाची तीर्थक्षेत्रे ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात त्यांना सरकारचा निधीही मुबलक प्रमाणात मिळतो, मात्र ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रांकडे आतापर्यंत हवे तितके लक्ष दिले जात नव्हते. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, निवारे, दर्शनदीर्घा तयार करणे, स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना, भक्तांना बसण्यासाठी सुयोग्य जागा इत्यादी सोयीसुविधांचा समावेश असेल, अशी माहिती मंत्री मंत्री महाजन यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास
ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र हाजी मलंग, श्रीक्षेत्र तीर्थधाम भुवनभानु मानस मंदिर, मांढरदेवी देवस्थान, श्रीक्षेत्र गोंदवले, पुसेगाव, शिखर शिंगणापूर, सज्जनगड (जि. सातारा), श्रीक्षेत्र जोतिबा, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, नरसिंह लक्ष्मी देवस्थान, श्री सिद्धगिरी मठ कणेरी, श्रीदत्त देवस्थान गगनगिरी (कोल्हापूर), श्री शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर, संत ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा, तीर्थक्षेत्र पुणतांबा, तीर्थक्षेत्र पुणतांबा, श्री निळोबाराय संजीवन समाधी मंदिर पिंपळनेर, श्री कानिफनाथ मढी, श्री क्षेत्र भगवानगड, जगदंबादेवी देवस्थान, कानिफनाथ मंदिर (अहमदनगर), श्री घृष्णेश्वर देवस्थान (संभाजीनगर), श्री महासिद्ध महाराज देवस्थान, श्री सुपोजी संस्थान, वारी हनुमान(बुलढाणा), ऋणमोचन, संत गुलाबराव महाराज संस्थान, संत मुक्ताई मंदिर (जळगाव), भैरवनाथ देवस्थान या तीर्थक्षेत्रांचा विकास होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.