स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय न होता विकास करणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही

ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विकासकामांसंदर्भात आढावा बैठक

28
स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय न होता विकास करणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही
  • प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला MMRDA चे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गगल, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोघरपाडा कार डेपो आणि रस्ते विकासावर सविस्तर चर्चा

मोघरपाडा कार डेपो उभारणीसाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गायमुख ते फाऊंटन आणि गायमुख ते दहिसर चेक नाका या ६० मीटर लांबीच्या प्रस्तावित रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासोबतच, रस्त्याचे विभाजन मध्यभागी ठेवण्याची मागणी MMRDA प्रशासनाने मान्य केली, असे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

(हेही वाचा – अखेर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्या परतीचा महिना ठरला)

डोंगरी कार शेडला संरक्षण

डोंगरी कार शेडसंबंधी चर्चा करताना स्थानिक भूमिपुत्रांनी रस्त्याचा पर्यायी मार्ग द्यावा, अशी मागणी केली. मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी कमीत कमी बाधित क्षेत्रातून रस्ता काढण्याचे निर्देश दिले.

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

मीरा-भाईंदर महापालिकेतील पिण्याच्या पाणीटंचाई प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांना पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी प्रशासनाला दिले.

(हेही वाचा – शिवसेना उबाठा गटाला आणखी एक धक्का! अखेर Rajan Salvi यांचा राजीनामा)

स्थानीय नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करतच विकास

बैठकीला उपस्थित स्थानिक भूमिपुत्रांनी त्यांच्या जमिनी व हक्कांच्या मुद्द्यांवर आवाज उठवला. यावर बोलताना सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, “विकासकामे करताना स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही. त्यांच्या हक्कांचे संरक्षण करूनच विकास होईल. त्यांना न्याय मिळेल, याची सरकारकडून पूर्ण काळजी घेतली जाईल. “ठाणे आणि मीरा-भाईंदर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणारे हे निर्णय लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीने करावी, असेही मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.