Mumbai मधील विकासकामांना गती मिळणार; सहा पुलांची कामे तीन महिन्यांत मार्गी लागणार

77

मुंबईतील १०० हून अधिक उड्डाणपूल, पादचारी पूल, स्कायवॉक, सबवे आदींची तातडीची आणि मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता असतानाच, महापालिकेच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पी (Municipal Budget 2025-26) अंदाजात मार्चपर्यंत सात पुलांची कामे पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर सात पुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. या पुलांपैकी अंधेरीतील गोखले पुलाचा (Andheri Gokhale Bridge) शेवटचा टप्पाही सेवेत येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे. 

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) २०२४-२५मध्ये रस्ते, वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण १२ हजार ११० कोटी रुपये ९७ लाख रुपयांची तरतूद केली. यातील पुलांच्या कामासाठी पाच हजार ५५५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. यातील बहुतांश नवीन कामासाठी निधी मंजूर केला गेला. यंदा २०२५-२६ मध्ये पुलांच्या कामांना गती मिळावी, यासाठी निधीत वाढ केली आहे. आठ हजार २३८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. पुलांच्या कामासाठी भरघोस निधी मिळाल्याने नव्या, जुन्या पुलांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma : निवृत्तीच्या प्रश्नावरून भडकला रोहित शर्मा, पत्रकारांना दिलं खरमरीत उत्तर)

मार्च पर्यंत पूर्ण होणारे प्रकल्प 

आर मध्य विभागांतर्गत बोरिवली पश्चिम चारकोप येथील रवी अपार्टमेंटजवळील पूल, आर दक्षिण विभागातील कांदिवली पश्चिम येथील नंदराम चाळ येथील विद्यमान पादचारी पूल, निष्कासन अणि शंकर लेन व इराणी वाडी रस्ता क्रमांक चारला जोडणारा नवीन पूल, पी दक्षिण विभागातील मृणालताई गोरे उड्डाणपूल अंतर्गत वालभट नाल्यावरील उड्डाणपुलाच्या टप्पा-१ आणि २ चे काम पूर्ण झाले असून, टप्पा ३ चे काम प्रगतिपथावर असून, एच पूर्व विभागातील वांद्रे पूर्व ते धारावी सायनपर्यंत मिठी नदीवरील नवीन पूल, टी विभागातील जय हिंद कॉलनी, नानेपाडा नाल्यावरील पुलाचे बांधकाम तसेच एस व टी विभागातील नाहूर स्थानक येथील रेल्वे रुळांवरील पूल, अंधेरी येथील गोखले पूल, अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाच्या (Andheri Gokhale Bridge) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून खुला करण्यात आला आहे.

(हेही वाचा – राजस्थानमध्ये येणार Anti-Conversion Law; काय आहेत तरतुदी)

प्रगतिपथावरील प्रकल्प

‘जी दक्षिण’तील नेहरू विज्ञान केंद्र व नेहरू तारांगणाला (Nehru Planetarium) जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाचे बांधकाम तसेच नेहरू विज्ञान केंद्राला लागून असलेल्या नाल्यावरील पूल, महालक्ष्मी स्थानकाजवळ रेल्वे रुळांवरील पुलांचे बांधकाम ३५ टक्के पूर्ण झाले आहे. महालक्ष्मी स्थानकाजवळील बांधकाम सुरू असलेल्या पूर्वेकडील रेल्वे रुळांवरील केबल स्टेड पुलाचा एन. एम. जेशी मार्ग जक्शन ते एस. ब्रीज जक्शन पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. तर पश्चिमेकडील बाजूस हाजी अली जंक्शनजवळील महालक्ष्मी रेसकॉर्स वाहनतळामधून जाणाऱ्या बांधकामाधीन पुलाची एक मार्गिका वळवण्याचे १० टक्के काम पूर्ण झाले असून, मुंबई सेंट्रल स्थानक येथील बेलासिस पुलाच्या रस्त्यांचे पुनर्बाधकाम पाच टक्के पूर्ण झाले, तर जेव्हीपीडी जंक्शन अंधेरी पश्चिम येथील जुहू-वर्सोवा रोडपासून सी. डी. बर्फीवाला रस्त्यापर्यंत उड्डाणपुलांचे बांधकाम तीन टक्के पूर्ण झाले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.