Veer Savarkar : राहुल गांधी सावरकरांच्या केसाएवढेही नाही – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोलूवर दिवसभर श्रम करून ज्या व्यक्तीला महाकाव्य स्फूरले त्या व्यक्तीची क्षमता काय आहे. याचा अंदाज राहुल गांधींना कधी येऊच शकत नाही.

180

राहुल गांधी जन्मातही सावरकर होऊ शकत नाही, ते सावरकरांच्या केसाऐवढेही नाहीत, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लेखिका शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्यात नागपुरात बोलत  होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर सावरकराच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : मोपला नरसंहार ते केरल स्टोरी आणि पुढे…)

राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या 82 पुस्तकातल्या 45 व्या कांदबरीचं प्रकाशन इंडीया बुक ऑफ रेकॉर्डंने सन्मानित पद्यगंधा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. यापूर्वी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ ही कादंबरी जयोस्तुते या नावाने हिंदी भाषेत देखील संघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते गुजरातमध्ये प्रकाशित झाली आहे.

(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : काळानुसार हिंदूंना मार्गदर्शक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर विचार!)

मृत्युंजयाचा आत्मयज्ञ या कादंबरीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोलूवर दिवसभर श्रम करून ज्या व्यक्तीला महाकाव्य स्फूरले त्या व्यक्तीची क्षमता काय आहे. याचा अंदाज राहुल गांधींना कधी येऊच शकत नाही, अशा प्रकारचे अत्याचार सोसत असताना सोबतच्या लोकांसाठी संघर्ष उभा करायचा हे कार्य केवळ सावरकर करू शकतात. सावरकरांचे बंधू देखील त्याच कारागृहात असताना त्यांची कधी भेट होत नव्हती. झालीच तर केवळ नजरेने ते एकमेकांशी बोलत होते. इतके अत्याचार सुरू असताना आपल्या सोबतच्या कैद्यासाठी त्यांनी संघर्ष उभा केला. सावरकरांनी हजारो देशभक्त तयार केले. राहुल गांधी जन्मात सावरकर होऊ शकत नाही. तुम्ही सावरकरांच्या केसाएवढे देखील होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे सावरकर नाही हे जे सत्य बोलतात, त्यावर मी आपले आभार मानेल अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली आहे. कार्यंक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ .वि.स. जोग होते. तसेच कवी अनिल शेंडे आणि संस्कार भारतीचे अखिल भारतीय साहित्य संयोजक आशुतोष अडोणी कादंबरीवर यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : आत्म्याचे समर्पण करणारा निश्चयाचा महामेरू!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.