Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही

81
Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही
Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही

कुणाल कामरा (Kunal Kamra) याने अलीकडेच सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं दिसत आहे. याप्रकरणी “स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कामराला हे माहित असलं पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार ते दाखवून दिलय. कोणाकडे स्वर्गीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची विरासत आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे”, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे.

( हेही वाचा :  Maulana Sajid Rashidi यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले, मराठा राजांना मारून…  )

तसेच पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे चुकीच आहे. तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही, अशा सूचक इशाराच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिला.

मुख्यमंत्र्यांची कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश

त्यातच विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी कुणाल कामराच्या प्रकरणावर शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी कुणाल कामरावर कठोरात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. याप्रकरणी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे ते फडणवीस म्हणाले.

दरम्यान कुणाल कामराने (Kunal Kamra) ज्या स्टुडिओमध्ये त्याचा ‘शो’ आयोजित केला होता, त्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच आमदार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी एमआयडीसी पोलिस (MIDC Police Station) ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.