एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर descriptive स्वरूपात होणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

35
एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर descriptive स्वरूपात होणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून युपीएससीच्या धर्तीवर descriptive स्वरूपात होणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा यावर्षीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) धर्तीवर descriptive स्वरूपात घेण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधान परिषदेत केली. तसेच स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्या नियोजित वेळेत घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : अनेक राज्ये रेशनकार्डचा वापर दिखाव्यासाठी करतात; दारिद्र्य रेषेखालील लोकांपर्यंत फायदे पोहोचतात का? Supreme Court चा सवाल

विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि विक्रम काळे (Vikram Kale ) यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षांमध्ये एकसमानता यावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताळमेळ साधला जाईल आणि त्यांना दोन्ही परीक्षांची तयारी करता येईल.”

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी ६१७ उमेदवारांची शिफारस शासनाकडे केली होती. त्यापैकी ५४० उमेदवारांना कागदपत्र तपासणीनंतर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.”

यावेळी त्यांनी एमपीएससीच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहितीही दिली. “एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना करण्यात येईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले. या निर्णयामुळे एमपीएससी परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि वेळेवर होईल, तसेच विद्यार्थ्यांना युपीएससीच्या धर्तीवर तयार होण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Devendra Fadnavis)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.