राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आजचा (२२ जानेवारी) हा सोहळा म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : श्रीरामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापना दिवस ही हिंदूंची दिवाळी)
काय म्हणाले फडणवीस ?
राम मंदिराच्या निमित्ताने २२ जानेवारीचा दिवस उत्सवाचा आहे. राम मंदिर म्हणजे भारताच्या अस्मितेची प्रतिकृती आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी राम रथ यात्रा काढली. या यात्रेची सांगता रविवार २१ जानेवारी रोजी झाली. यानिमित्त फडणवीस बोलत होते.
राम मंदिर आंदोलनाचा जुना फोटो टि्वट करत देवेंद्र फडवणीस यांनी जुन्या आठवनींना दिला उजाळा
.
.
.#jaishreeram #RamJanmbhoomiMandir #RamLallaVirajman #RamLalla #RamMandir #RamMandirAyodhya #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/IuXHn8ZcNp— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 21, 2024
(हेही वाचा – Ram Janmabhoomi Movement : रामजन्मभूमी आंदोलनाचे राजकीय परिणाम)
एक नवीन भारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल –
आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. तेव्हापासून एक नवीन भारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक असा भारत ज्याला आपल्या संस्कृतीवर गर्व आहे. एक असा भारत की जो कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये राहणार नाही. गुलामीची प्रत्येक निशाणी त्या ठिकाणी संपेल आणि जगाच्या पाठीवर आपला विचार दृढपणे सांगणारा भारत हा आजपासून आपण तयार करतो आहोत आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी हा दिवस अगदी उत्सवाप्रमाणा साजरा करावा, असे आवाहनही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community