Devendra Fadnavis : मंदिरही बनवले आणि ३७० ही हटवले; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Devendra Fadnavis : आम्ही मंदिर पण बनवले आणि तारीख पण सांगितली, हिम्मत असेल, तर २२ जानेवारीला या, तुम्हालाही मंदिर कसे उभारले आहे, ते दाखवू, अशी चेतावणी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिली आहे.

201
Devendra Fadnavis : मंदिरही बनवले आणि ३७० ही हटवले; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा
Devendra Fadnavis : मंदिरही बनवले आणि ३७० ही हटवले; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

संसदेत अटलजींना किमान कार्यक्रमात ना राम मंदिर आहे, ना ३७० कलम आहे, असे म्हणून विरोधक हिणवायचे. तेव्हा अटलजी म्हणायचे की, यह २२ पार्टी की सरकार आहे. जेव्हा आमचे सरकार येईल, तेव्हा राममंदिर (ram mandir ayodhya)  होईल. आज आम्ही राममंदिर पण उभारले आणि ३७० कलम (article 370) रद्द देखील करून दाखविले, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढले.

(हेही वाचा – ST Breakfast Scheme : ३० रुपयांत नाष्ट्याची एसटीची योजना अडगळीत; प्रवाशांची लूट सुरुच)

‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ वितरणाचे औचित्य

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने ‘प्राज इंडस्ट्रीज’चे प्रमोद चौधरी (२०२३) , ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे (२०२२) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती

या वेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ शां. ब मुजुमदार, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.

(हेही वाचा – Thane Kasheli Bridge : ठाणे खाडीवरील कशेळी पुलाचे यासाठी होणार स्ट्रक्चरल ऑडीट)

२२ जानेवारीला मंदिर कसे उभारले ते दाखवू

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आज लोक विचारतात, राममंदिर तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का ? तेच लोक ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत होते; मात्र तारीख सांगत नव्हते. आम्ही मंदिर पण बनवले आणि तारीख पण सांगितली, हिम्मत असेल, तर २२ जानेवारीला (ramlala pran pratishtha) या, तुम्हालाही मंदिर कसे उभारले आहे, ते दाखवू. (Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.