बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापक पदावरून जैन यांना हटवले

158

अंधेरी राजे शहाजी क्रिडा संकुल व मुलुंड कालिदास नाट्यगृहाच्या बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकासह उपआयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) तसेच महापौरांचे विशेष कार्य अधिकारीपदी (ओएसडी) नियुक्ती करण्यात आलेल्या निवृत्त उपायुक्त देवेंद्र जैन यांची अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी उचलबांगडी केली आहे. जैन यांची ११ महिन्यांच्या कालावधीसाठी ओएसडीपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु ही मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांना बाजुला करण्यात आले असून ललित कला व क्रीडा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमुळे जैन यांना पदावरुन बाजुला केल्याची माहिती मिळत आहे. जैन यांच्या या जागी पर्यावरण विभागाचे ओएसडी सुनील गोडसे यांची वर्णी लावली गेली आहे.

२८ फेब्रुवारी २०२२ रोजी जैन यांना पुन्हा मुदतवाढ दिलेली

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येवून सध्या महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकाच अस्तित्वात नसल्याने महापौर, गटनेतेही नाहीत. मात्र, महापौर नसताना त्यांच्या कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी विद्यमान विशेष कार्य अधिकारी(ओएसडी) देवेंद्रकुमार जैन यांना आणखी ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. महापालिका ७ मार्च २०२२ रोजी बरखास्त होण्यापूर्वी आयुक्तांनी २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जैन यांना पुन्हा मुदतवाढ देऊन त्यांना ११ महिन्यांकरता या पदावर ठेवण्याचा कंत्राट करार केला होता. विशेष म्हणजे जैन यांची नियुक्ती ८ मार्च २०२२पासून दाखवण्यात आली होती आणि त्यादिवसापासून महापौर पदी कुणीही नव्हते, या दिवसापासून महापालिकेत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली होती.

(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )

जैन यांची उचलबांगडी करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले

सेवानिवृत्त झालेल्या जैन यांच्यावर ही जबाबदारी सोपवताना उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) कार्यालयासह शहाजी राजे भोसले अंधेरी क्रीडा संकुल, अंधेरी (प.), कालिदास नाट्यगृह मुलुंड (प.) यांची जबाबदारी सोपवली होती. हे सर्व प्रकारचे कामकाज ११ महिन्यांच्या कंत्राट कालावधीत पाहतील,असे त्यांच्या नियुक्तीच्या आदेशात नमूद केले होते. जैन यांची मुदत ७ फेब्रुवारी २०२३पर्यंत होती, परंतु ९ डिसेंबर २०२२ रोजी सामान्य प्रशासनाच्यावतीने कार्यालयीन आदेश जारी करत देवेंद्र कुमार जैन यांची करारपत्रातील नियुक्ती ही ९ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात येत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील सौदर्यीकरणाच्या प्रकल्प कामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलात मागील आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमाच्यावेळी या क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये संकुलातील कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्दयासह इतर मुद्देही या शिष्टमंडळाने पुराव्यासह मांडले. त्यातच महापौर नसतानाही जैन हे महापौरांचे ओएसडी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जैन यांची नियुक्ती चुकीच्या पध्दतीने केल्याची बाब समोर आल्याने मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेत जैन यांची उचलबांगडी करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते, त्यानुसार आयुक्तांनी जैन यांची उचलबांगडी केल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.