APMC Market मध्ये हापूसच्या १७५ पेट्या दाखल; ७ ते १२ हजार भाव

59
APMC Market मध्ये हापूसच्या १७५ पेट्या दाखल; ७ ते १२ हजार भाव
APMC Market मध्ये हापूसच्या १७५ पेट्या दाखल; ७ ते १२ हजार भाव

आंब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा देवगड हापूस (Devgad Hapus) वाशीच्या एपीएमसी (APMC Market ) फळ बाजारात दाखल झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी हापूस आंब्याच्या १७० ते १७५ पेट्या बाजारात दाखल झाल्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

( हेही वाचा : काही गोष्टी चौकटीहेरच्या असतील; डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी S Jaishankar यांचे विधान

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. देवगड (Devgad) तालुक्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar), मीठमुंबरी या भागातून हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. फळ बाजारातील आंब्याचे व्यापारी संजय पानसरे (Sanjay Pansare) यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने पूजा करून देवगड हापूस आंब्याच्या हंगामाची सुरुवात करण्यात आली आहे. चार ते पाच डझनच्या पेटी स्वरुपात हा आंबा बाजारात विक्रीस असून, सुमारे सात ते १२ हजार रुपये भाव मिळत आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.