DGCA Chief : केंद्राने DGCA प्रमुखांना हटवले; 30 विमानांना आल्या बॉम्बने उडवण्याच्या धमक्या 

106
DGCA Chief : केंद्राने DGCA प्रमुखांना हटवले; 30 विमानांना आल्या बॉम्बने उडवण्याच्या धमक्या 
DGCA Chief : केंद्राने DGCA प्रमुखांना हटवले; 30 विमानांना आल्या बॉम्बने उडवण्याच्या धमक्या 

देशातील प्रवासी विमानांकडून धमक्यांची मालिका सुरूच आहे. शनिवारी 30 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी (Bomb Threat) देण्यात आली होती. त्यामुळे विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर पूर्ण तपासणीनंतर विमाने रवाना करण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे तासतांस हाल झाले. (DGCA chief)

केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोकडून या संदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे. सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीलाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, संध्याकाळी उशिरा केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने डीजीसीए प्रमुख विक्रम देव दत्त (DGCA Chief Vikram Dev Dutt) यांना पदावरून हटवून कोळसा मंत्रालयात सचिव केले. हा बदल धमकीच्या बाबींशी जोडला जात आहे.

त्याच वेळी, एकाच वेळी 30 धमक्या मिळाल्यानंतर, विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ब्युरोचे महासंचालक झुल्फिकार हसन (Director General Bureau Zulfiqar Hasan) यांनी त्यांना आश्वासन दिले की भारतीय आकाश पूर्णपणे सुरक्षित आहे.

एका आठवड्यात 200 कोटी रुपयांचे नुकसान

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमान त्याच्या नियोजित विमानतळाऐवजी जवळच्या विमानतळावर उतरवण्यात आले. यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो एवढेच नाही तर विमानाची पुन्हा तपासणी करणे, प्रवाशांना हॉटेलमध्ये बसवणे आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्याची व्यवस्था करावी लागते. (DGCA Chief)

एका अहवालानुसार या सगळ्यावर सुमारे 3 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या आठवड्यात विस्तारा, एअर इंडिया, इंडिगो, आकसा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या 70 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमक्या आल्या आहेत.

(हेही वाचा – भारताच्या प्रगतीसाठी एआय ते ऍस्पिरेशनल इंडिया पर्यंतचा प्रवास महत्त्वाचा; PM Narendra Modi यांचे विधान)

लंडन आणि दुबईला जाणाऱ्या विमानांना बॉम्बची धमकी

शुक्रवारी रात्री उशिरा एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि विस्तारा एअरलाइन्सच्या (Vistara Airlines) प्रत्येकी एका फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. यापैकी दिल्लीहून लंडनला जाणारे विस्तारा विमान फ्रँकफर्टला वळवण्यात आले. तर 189 प्रवाशांना घेऊन दुबई जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचे (IX-196) फ्लाइटचे जयपूरमध्ये दुपारी 1:40 वाजता आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तपासादरम्यान दोन्ही विमानांमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.