Air Asia या विमान प्रवासी कंपनीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठी कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या कंपनीवर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वैमानिकांच्या कौशल्याच्या चाचणीदरम्यान एअर एशियाच्या वैमानिकांनी वेळापत्रकानुसार काही नियम पाळलेले नाहीत, असे डीजीसीएने म्हटले आहे.
वैमानिकांच्या प्रशिक्षणावेळी निष्काळजीपणा केल्याचे आढळले
एअर एशियाच्या आठ नियुक्त परीक्षकांना त्यांच्या कामात निष्काळजीपणासाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नागरी विमान वाहतुकीच्या आवश्यक नियमांनुसार काम न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने केलेल्या तपासणीत एअरएशिया लिमिटेडने वैमानिकांच्या प्रशिक्षणावेळी निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार त्यांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार कर्तव्ये पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर एशियाच्या प्रशिक्षण प्रमुखाला तीन महिन्यांसाठी त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय नामांकित आठ परीक्षकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित व्यवस्थापक, प्रशिक्षण प्रमुख आणि AirAsia च्या सर्व नियुक्त परीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
(हेही वाचा पुणे पोट निवडणुकीत बॅनरबाजी; आमचं ही ठरलं धडा कसा शिकवायचा)
Join Our WhatsApp Community