देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाल्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारकडून अलर्ट मोड जारी करण्यात आला आहे. त्यामुळेच आता विमान प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. Directorate General of Civil Aviation (DGCA)कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रवाशांकडून या नियमाचे पालन करण्यात येणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः आम्ही हेल्मेट घालतो, पण रस्त्यांवरील खड्ड्यांचे काय? मुंबई ट्रॅफिक पोलिसांना नागरिकांचा संतप्त सवाल)
कडक कारवाई होणार
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून आता विमान प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी CISFच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. जे प्रवासी या नियमावलीचे पालन करणार नाहीत त्यांना टेक ऑफच्या आधीच घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही डीजीसीए कडून सांगण्यात आले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाकडून विमान आणि विमानतळ येथे कोविड प्रोटोकॉलचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले होते. जे या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आता DGCA कडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community