विमान प्रवास करावा, अशी प्रत्येक व्यक्तिची इच्छा असते. सध्या देशभरात सुरू असलेला सणासुदीचा हंगाम आणि देशांतर्गत भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची क्रेझ वाढत असल्याचं दिसून येत आहे. (Airlines)
देशांतर्गत विमान कंपन्यांनी हवाई भाड्यात वाढ केली आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. डीसीजीएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ११ टक्क्यांनी वाढली आहे. सुमारे १.२६ कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. इंडिगो एअरलाइन्स या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.
(हेही वाचा – World Cup Final Ind vs Aus : साखळी सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताची अवस्था ३ बाद २ अशी केली होती )
७९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. या कालावधीत एअर इंडियाचा बाजार हिस्सा 10.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विस्तारा आणि एअर एशियाच्या बाजारपेठेत घसरण झाली आहे. आता विस्ताराचा बाजार हिस्सा 9.7 टक्के आणि एअर एशियाचा 6.6 टक्के आहे. स्पाइस जेटचा बाजारातील हिस्सा 4.4 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे, अशी माहिती डीजीसीएकडून देण्यात आली आहे.
हेही पहा –