राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्यासह सेवानिवृत्त एसीपी सरदार पाटील आणि एका वकीलासह ७ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात खंडणी, खोट्या गुन्ह्यात अडकवणे, खोटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी मंगळवारी (२७ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रातदार संजय पुनामिया (Attorney Sanjay Punamia) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार संजय पुनामिया (Attorney Sanjay Punamia) हे मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे राहणारे व्यवसायिक आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे नगर पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीररित्या तपास करण्यात आला होता, या बेकायदेशीर तपासात तक्रारदार पुनामिया आणि इतर व्यवसायिकाना अडकविण्याची धमकी देऊन खंडणी स्वरूपात मोठ्या रकमा उकळण्यात आल्या होत्या. तसेच खोटी कागदपत्रे (False documents) तयार करून एका वकिलाला सरकारी वकील बनवून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली होती अशी तक्रार पुनामिया यांनी ठाणे नगर पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, एसीपी सरदार पाटील (ACP Sardar Patil), पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्यासह इतर ३ खाजगी व्यक्ती या सर्व गुन्ह्यात सामील होते. २०२१ ते २०२४ दरम्यान ठाणे आणि मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात कट रचण्यात आला होता असा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
या प्रकरणी ठाणे येथील पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे, एसीपी सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्यासह अन्य ३ खाजगी व्यक्तीसह ७ जणांविरुद्ध खंडणी, कट रचणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे,धमकी देणे खोटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम१६६(अ), १३०(ब), १७०, १९३, १९५, १९९, २०३, २०५, २०९, ३५२, ३५५, ३८४, ३८९, ४६५, ४६६, ४७१ आणि ५०९ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community