राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी(Dhananjay Munde) नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या(Namo Shetkari Mahasanman Yojana) दुसऱ्या हप्त्यापोटी १७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णयही आजच निर्गमित करण्यात आल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी बुधवारी मंत्रालयात(mantralaya) पत्रकारांशी बोलताना केली.
या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. तसेच ही रक्कमही फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहितीही मुंडे(Dhananjay Munde) यांनी दिली.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या(Central government) पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना(Dhananjay Munde) सुरू केली.याअंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत असल्याचे मुंडे(Dhananjay Munde) यांनी यावेळी स्पष्ट केले.
एप्रिल ते जुलै २०२३ या पहिल्या हप्त्यामध्ये १७२० कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते.त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या दुसऱ्या हप्त्यासाठी आता १७९२ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिना अखेरपर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याचेही कृषिमंत्री मुंडे(Dhananjay Munde) यांनी नमूद केले.
राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर एक विशेष मोहिम राबवली असता या अंतर्गत या योजनेसाठी(Dhananjay Munde) पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली.यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे १३ लाख शेतकऱ्यांची वाढच झाल्याचा दावाही मुंडे यांनी केला.(Dhananjay Munde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community