धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात कुटुंब न्यायालयाने निकाल दिला होता. वांद्रेच्या कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपयाची पोटगी द्यावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यांच्या याचिकेवर शनिवारी सुनावणी पार पडली. माझगाव कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आता निकाल जाहीर केला आहे. हा निकाल धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारा आहे. कारण माझगाव कोर्टाने वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची याचिका फेटाळत कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल करुणा शर्मा यांच्याच बाजूने लागल्याचं मानलं जात आहे.
या युक्तिवादावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे अंतिम इच्छापत्र तसेच स्वीकृती पत्र सादर केले. पण संबंधित कागदपत्रे हे बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. खरंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाने निकाल दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी दोन वेळा सुनावणी पार पडली. याआधी पार पडलेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत आपले लग्न झाले नसल्याचा युक्तिवाद केला. असे असले तरी त्यांनी करुणा शर्मा यांच्यापासून दोन मुलांना जन्म झाला. त्या दोन्ही मुलांची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी न्यायालयात मान्य केले होते. पण आपले अधिकृतपणे करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झाले नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांचा वकिलांकडून करण्यात आला होता.
न्यायालयात काय-काय घडले?
दरम्यान, सुनावणीवेळी करुणा शर्मा यांनी अतिशय महत्त्वाचे दस्तावेज सादर केले. यामध्ये पासपोर्ट, रेशन कार्डमध्ये तसेच स्वीकृती पत्र आणि अंतिम इच्छापत्र यांचा समावेश होता. या कागदपत्रांमध्ये करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केल्याचे म्हटले आहे. तसेच स्वीकृती पत्रात धनंजय मुंडे यांनी स्पष्ट म्हटले आहे की, कुटुंबीयांच्या दबावामुळे मी दुसरे लग्न केले आहे. पण मी करुणा शर्मा आणि मुलांचादेखील सांभाळ करेन. या कागदपत्रांचे निरीक्षण करुन माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला.
Join Our WhatsApp Community