Dhanteras 2023 : दिवाळीला सुवर्णझळाळी ! धनत्रयोदशीला भारतियांनी खरेदी केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे सोने-चांदी

धनत्रयोदशीला संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत 27,000 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात सोन्या-चांदीचा अधिकृत व्यापार 30,000 कोटी रुपयांचा झाला.

100
Dhanteras 2023 : दिवाळीला सुवर्णझळाळी ! धनत्रयोदशीला भारतियांनी खरेदी केले तब्बल 'इतक्या' कोटींचे सोने-चांदी
Dhanteras 2023 : दिवाळीला सुवर्णझळाळी ! धनत्रयोदशीला भारतियांनी खरेदी केले तब्बल 'इतक्या' कोटींचे सोने-चांदी

पाच दिवसांच्या दिवाळी उत्सवाला देशभरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. (Dhanteras 2023) धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. १० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या तमाम भारतियांनी तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे सोने-चांदी खरेदी केले.

दिवाळीच्या निमित्ताने सर्व शहरांमध्ये बाजारपेठा मध्यरात्रीपर्यंत खुल्या होत्या आणि लोक खरेदी करत होते. रस्त्यांवरही प्रचंड गर्दी झाली होती. धनत्रयोदशीला संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत 27,000 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर देशभरात सोन्या-चांदीचा अधिकृत व्यापार 30,000 कोटी रुपयांचा झाला. (Dhanteras 2023)

(हेही वाचा – Cleaning Tips : या टिप्स फाॅलो केल्याने घराची साफसफाई करणे होईल सोपे)

दिवाळीच्या कालावधीत देशव्यापी व्यापार 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये एकट्या दिल्लीचे योगदान 5,000 कोटी रुपये आहे, असा अंदाज कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स CAIT ने वर्तविला.

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले की, आज देशभरात सुमारे 30 हजार कोटी रुपयांची सोने, चांदी आणि इतर वस्तूंची उलाढाल झाली आहे. सुमारे 27 हजार कोटी रुपयांच्या सोन्याच्या वस्तू विकल्या गेल्या, तर चांदीचा व्यापार देखील सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा होता. (Dhanteras 2023)

(हेही वाचा – Halal Free Diwali : दिवाळीची खरेदी करताय, सतर्क रहा…)

गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी हा व्यवसाय सुमारे 25 हजार कोटी रुपये होता आणि गेल्या वर्षी सोन्याची किंमत 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, तर आज ती 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

गेल्या दिवाळीत चांदी 58000 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती, तर आता ती 72000 रुपये प्रति किलो झाली आहे. (Dhanteras 2023)

एका अंदाजानुसार, आज धनत्रयोदशीच्या दिवशी देशात सुमारे 41 टन सोने आणि सुमारे 400 टन चांदीचे दागिने आणि नाणी विकली गेली. दरवर्षी सुमारे 800 टन सोने आणि सुमारे 4 हजार टन चांदी परदेशातून आयात केली जाते. (Dhanteras 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.