धारावी (Dharavi) विकास प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून या भागातील प्रत्येक घरांचे आणि कुटुंबांचे बायोमेट्रीक सर्वे सुरु असतानाच काही कुटुंबांकडून याचा फायदा घेत पक्की घरे बनवली जात आहे. धारावीतील चमडा बाजार येथील एकेजी नगरमध्ये अशाचप्रकारे सुरु असलेल्या पक्क्या बांधकामांवर महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने बुधवारी कारवाई करण्यात आली. (Dharavi)
धारावीमध्ये (Dharavi) सध्या अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात फोफावली असून कच्च्या घरांच्या जागी पक्की घरे बांधली जात आहे. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेला कायमच टिकेचे धनी बनवले जात असून धारावीमध्ये सध्या सुरु असलेल्या धारावी (Dharavi) विकास प्रकल्पांमुळे याचा फायदा घेत अनधिकृत बांधकामे सध्या सुरु आहेत. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने चमडा बाजार येथील एकेजी नगर येथे पक्के बांधकाम सुर असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. (Dharavi)
(हेही वाचा – Congress Income Tax Penalty : काँग्रेसला झटका; 210 कोटींच्या दंडाला स्थगिती नाहीच)
परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता राजेश राठोड यांच्यासह महापालिकेचे पाच अभियंते, ५० कामगार, २ गॅस कटरच्या माध्यमातून धारावी व शाहू नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या संरक्षणात या पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. धारावी (Dharavi) विकास प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आल्याने याच्या आड ही अनधिकृत पक्की बांधकामे सुरु होती. जुन्या झोपड्यांच्या जागेवर ही बांधकामे केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Dharavi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community