Dharavi Masjid Demolition : अनधिकृत बांधकाम तोडण्यात आडकाठी आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल; प्रसाद लाड यांनी दिला इशारा

53
Dharavi Masjid Demolition : अनधिकृत बांधकाम तोडण्यात आडकाठी आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल; प्रसाद लाड यांनी दिला इशारा
Dharavi Masjid Demolition : अनधिकृत बांधकाम तोडण्यात आडकाठी आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल; प्रसाद लाड यांनी दिला इशारा

धारावीतील अनधिकृत बांधकामाला (Dharavi Masjid Demolition) महानगरपालिकेने याबाबतीत एक महिन्यापूर्वीच निवेदन दिले होते. यावर ५ सप्टेंबर रोजी कारवाई करण्याबाबत नोटीस काढली होती. परंतु, गणेशोत्सव आणि ईदचा काळ असल्याने महापालिका आणि पोलिसांच्या विनंतीनुसार आज कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. ही कारवाई पूर्णत्वाकडे नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अनधिकृत बांधकाम तोडण्यात आडकाठी आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिली आहे. धारावीतील अनधिकृत मशि‍दीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर धर्मांधांनी दगडफेक केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर प्रसाद लाड यांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते.

(हेही वाचा – Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त)

प्रसाद लाड म्हणाले की, आम्ही आता पोलिस उपायुक्तांची भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केली. ज्या माणसाने इथे गर्दी जमा केली त्याला एका मशिदीचे लेटरहेड वापरून सेक्रेटरी आणि प्रेसिडेंटला भडकावून दंगल घडवणे या गुन्ह्याखाली अटक केली जाईल. तसेच ज्यांनी शासकीय वाहनावर दगडफेक केली, त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल, असा इशारा लाड यांनी दिला.

एफआयआरमध्ये त्यांनी इथे १०० ते १५० लोकं असल्याची नोंद केली होती; परंतु या मशिदीला वाचवण्यासाठी किमान १ हजारहून अधिक लोकं आली होती. हे लोकं आतले होते की, बाहेरचे याचा शोध पोलीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेत आहेत. पण येत्या २४ तासांत त्यांना अटक झाली नाही तर स्वत: मंगलप्रभात लोढा आणि आम्ही या पोलिस स्टेशनकडे धरणे आंदोलन करु. दंगली घडवणे, लोक एकत्र करणे, शासकीय वाहनांचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि लोकांना भडकवणे, असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” असे प्रसाद लाड यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.