Dharavi Project : धारावीत सन २०११नंतरच्या रहिवाशांना भाडेतत्वावरील घरे

882
Dharavi Project : धारावीत सन २०११नंतरच्या रहिवाशांना भाडेतत्वावरील घरे
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

धारावी विकास प्रकल्पाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असला तरी प्रत्यक्षात सन २०११पर्यंत जे स्थानिक रहिवाशी आणि उद्योगधंदे आहेत, त्यांचे पुनर्वसन हे धारावीतच केले जाणार आहे. मात्र, सन २०११नंतरचे रहिवाशी कुटुंबे आहेत त्यांना भाडेतत्वावरील घरे दिली जाणार आहे. या घरांमध्ये दहा ते बारा वर्षे भाडे देऊन राहिल्यानंतर त्या घरांची मालकी हक्क त्यांच्या नावे करून दिला जाणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. (Dharavi Project)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis मनसेबाबत स्पष्टच म्हणाले, …शक्य असेल तिथे मनसेला सोबत घेऊ!)

धारावी विकास प्रकल्प आणि या प्रकल्पासाठी नेमलेल्या अदानी कंपनीला विरोधी पक्षाकडून विरोध होत आहे, याबाबत वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीतील प्रश्नाला उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर केलेला हा प्रकल्प असून त्यांनी मंजूर केलेल्या निविदेत केवळ दोन बदल केले आहेत. ते म्हणजे टीडीआरचे. यापूर्वी टीडीआचे वितरण उत्तर दिशेलाच करता येणार होते, त्यात बदल करत आम्ही या टीडीआरची विक्री दक्षिण दिशेलाही करता येईल अशी अट सुधारीत केली आणि ही अट टाकतानाच त्यात कॅपिंगही घातले. तसेच याचे वितरण डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे कोणी किती टीडीआर विकत घेतला आणि विकला गेला याची माहिती मिळेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची मक्तेदारी राहणार नाही. हीच निविदा आम्ही मागवली आणि त्यात अदानी कंपनी पात्र ठरली आहे. (Dharavi Project)

(हेही वाचा – Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक; न्यायालयीन स्थगिती उठवण्याच्या सरकारकडून हालचाली सुरु)

यामध्ये धारावीत राहणाऱ्या सन २०११पर्यंतच्या पात्र कुटुंबांचे तथा व्यावसायिक गाळेधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी केले जाणार आहे. तसेच त्यानंतरचे जे अपात्र कुटुबे आहेत, त्यांचेही पुनर्वसन नवीन घरांमध्ये केले जाणार आहे. मात्र, या सन २०११नंतरच्या कुटुंबांना भाडेतत्वावरील अर्थांत रेंटल हौसिंग घरे वितरीत केली जातील. कारण जर यांचे पुनर्वसन केले नाही तर ते दुसऱ्या ठिकाणी जावून झोपड्या बांधतील. त्यामुळे या कुटुंबांचे पुनर्वसन रेंटल हौसिंगमध्ये करून दहा ते बारा वर्षे भाडेतत्वावरील घरांमध्ये राहिल्यानंतर त्याच कुटुंबांचे नावे ही घरे मालकी हक्काने केली जातील अशाप्रकारचा निर्णयही घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी केले. यामुळे गरीब कुटुंबांनाही घरे मिळणार आहे. (Dharavi Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.