Dharavi Redevelopment Project : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपांबाबत शेवाळेंचा पलटवार

172
Dharavi Redevelopment Project : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' आरोपांबाबत शेवाळेंचा पलटवार

धारावीतील निसर्ग उद्यान, धारावी कोळीवाडा, मलनिःसारण प्रकल्प यांसारख्या बाबींमुळे धारावीत सध्या अस्तित्वात असलेली संपूर्ण जागा पुनर्विकासासाठी वापरता येणार नाही, याचीही कल्पना सर्वांना आहे. मात्र तरीही, अदानी यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या मित्राच्या हितासाठी हे आरोप केले जात आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईत जो शाही विवाह सोहळा पार पडला, ‘त्या’ मित्राच्या हितासाठी उद्धवजी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून अदानीवर बोगस आरोप करत आहेत, असाही हल्ला शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी चढविला. निवडणूक आयोगाने नुकतीच उबाठाला देणगी स्वीकारण्याची मान्यता दिली आहे. आज धारावी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेले बिनबुडाचे आरोप पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी होते का? असाही प्रश्न राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला आहे. (Dharavi Redevelopment Project)

धारावीत ३५० चौरस फुटापेक्षा मोठे घर देता येणार नाही

चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल शेवाळे म्हणाले की, उद्धवजी ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका का केली? यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? याबाबत जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. धारावीकरांना पुनर्विकासात ३५० चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय हा उद्धवजींना विश्वासात घेऊन करण्यात आला होता. सीआरझेड ची नियमावली, हवाई वाहतुकीबाबतचे नियम या सगळ्या बाबींचा विचार करून धारावीत ३५० चौरस फुटापेक्षा मोठे घर देता येणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांनाही ठाऊक आहे. मात्र तरीही केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ५०० चौरस फुटांच्या घराचा अवास्तव मुद्दा विरोधकांकडून समोर आणला गेला. (Dharavi Redevelopment Project)

प्रकल्प रोखण्यासाठी विरोधकांकडून अवास्तव मागण्या

तसेच धारावीतील निसर्ग उद्यान, धारावी कोळीवाडा, मलनिःसारण प्रकल्प यांसारख्या बाबींमुळे धारावीत सध्या अस्तित्वात असलेली संपूर्ण जागा पुनर्विकासासाठी वापरता येणार नाही, याचीही कल्पना सर्वांना आहे. मात्र तरीही, अदानी यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या मित्राच्या हितासाठी हे आरोप केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या काळात वेग आला असून, केवळ हा प्रकल्प रोखण्यासाठी विरोधकांकडून अवास्तव मागण्या आणि आरोप केले जात आहे. (Dharavi Redevelopment Project)

राजकीय पोळी भाजण्यासाठी संभ्रमाचे वातावरण

विरोधकांना धारावीकरांच्या हिताची कोणतीही काळजी नसून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. “आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत निराधार आरोप केले” अशी टीका शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. (Dharavi Redevelopment Project)

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्या चेहऱ्यावर विधानसभा लढण्यास काँग्रेस-शरद पवार गटाचा विरोध)

प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याच ठिकाणी घर आणि दुकान

वास्तविक, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अदानी यांचा प्रकल्प नसून राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याच ठिकाणी घर आणि दुकान मिळेल, तसेच अपात्र लोकांनाही घर दिले जाईल याची शाश्वती याआधीही शासनाने देऊ केली आहे. तरीही विरोधकांकडून वारंवार गैरसमज पसरवण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. (Dharavi Redevelopment Project)

पक्षाच्या देणगीसाठी निराधार आरोप…

निवडणूक आयोगाने नुकतीच उबाठा गटाला देणगी स्वीकारण्याची मान्यता दिली आहे. आज धारावी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेले बिनबुडाचे आरोप पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी होते का? असाही प्रश्न राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला. (Dharavi Redevelopment Project)

स्थानिक मुंबईकरांच्या भावना लक्षात घेणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुंबईतील विक्रोळी, मुलुंड, कुर्ला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या जागेबाबत स्थानिक मुंबईकरांनी नोंदवलेला आक्षेप आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊनच राज्य सरकार कृती करेल, अशी हमी देखील राहुल शेवाळे यांनी दिली. (Dharavi Redevelopment Project)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.