धारावीत सलग दुसऱ्या दिवशी ‘शून्य’! 

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७०२ दिवसांवर आला आहे.

60

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारप्रमाणेच मंगळवारी, १५ जून रोजीही धारावीत एकही करोना रुग्ण आढळला नाही. तसेच धारावीत फक्त ११ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे धारावीकरांसाठी आणि मुंबई महापालिका प्रशासनासाठी देखील ही दिलासादायक बाब ठरली आहे.

मुंबईतील मंगळवारी, १५ जून रोजी कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५७५ झाली आहे, तर दिवसभरात ७१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात १४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

(हेही वाचा : अयोध्येच्या जमिनीचा ‘तो’ करार १० मिनिटांतील नव्हे, तर १० वर्षांपूर्वीचा! )

अशी आहे रुग्ण संख्या!

सोमवारी मुंबईत संपूर्ण दिवसभरात ५२९ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी ५७५ रुग्ण आढळून आले आहेत. तर संपूर्ण दिवसभरात २३ हजार ६८१ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत मंगळवारपर्यंत १५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तरसोमवारी जिथे १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे मंगळवारी १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १० पुरुष आणि ४ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांखाली १ रुग्णांचा समावेश असून, ६० वर्षांवरील ७ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ६ एवढी आहे.

मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७०२ दिवसांवर!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ७०२ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ७६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही १९ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.