विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईतील दिव्यांगांचे (disabled) जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने महापालिकेच्यावतीने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme) लागू करण्यात आली असून या योजनेसाठी आतापर्यंत ३८९५ दिव्यांगांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील आतापर्यंत १,१४७ दिव्यांगांना अर्थसहाय देण्यात आले आहेत. (Dharmaveer Anand Dighe)
दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत मुंबईत सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजने अंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईत ही योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला असून यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. मुंबईतील कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या दृष्टी नसलेले, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्तींना सामान्य जीवन जगता यावे, योग्य औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परालंबित्व कमी व्हावे, यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
(हेही वाचा – Love Jihad : पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारतीय हिंदू मुलीशी करणार विवाह)
या दिव्यांग बांधवांना मिळणार योजनेचा लाभ
या योजने अंतर्गत वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व आलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित सहा हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक १२ हजार रुपये मिळतील.
तसेच ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा तीन हजार रुपये या हिशोबाने दर सहा महिन्यानंतर एकत्रित १८ हजार रुपये याप्रमाणे वितरित करण्यात येईल. म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील. या दोन्ही गटातील दिव्यांगांना पुढील पाच वर्षांकरिता हा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
(हेही वाचा – Sheikh Hasina यांची घोषणा; म्हणाल्या, बांगलादेशात पुन्हा जाणार; प्रत्येक हुतात्म्याचा बदला घेणार)
जुलै २०२४ पासून दिव्यांगासाठी या योजनेच्या (Disability Scheme) अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत ३,८९५ दिव्यांगांनी अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे. त्यातील १,१४७ दिव्यांगांना आतापर्यंत नियोजन विभागाच्यावतीने लाभ देण्यात आला आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने दिव्यांगांना या योजनेचा लाभ देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जात आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community