“औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर प्रेम असणाऱ्यांनी स्वतःच्या घरात त्याची कबर बनवावी”, असे विधान बागेश्वर धामचे पिठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेल्या वादात धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनीही उडी घेतली आहे. ते म्हणाले, “ज्या औरंगजेबाने देश तोडण्याचं काम केलं त्याच्या आठवणी नष्ट केल्या पाहिजेत, त्याचं अस्तित्व कायमचे मिटवलं पाहिजे.” असे विधान शास्त्री यांनी एका कार्यक्रमात मुलाखत देताना केले.
( हेही वाचा : Halonix : सीएफएल बल्ब बनवणाऱ्या हॅलोनिक्स कंपनीचे मालक नेमके कोण आहेत?)
पुढे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) म्हणाले, “औरंगजेबाचं (Aurangzeb) नामोनिशान मिटवून टाकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, औरंगजेबाने चांगली कामं देखील केली होती. मीही ते स्वीकारतो. परंतु, कोणी तुमच्या कानशीलात वाजवली आणि नंतर तुम्हाला पाणी देखील पाजलं तर तुम्ही नेमकं काय लक्षात ठेवाल? असंही नाही की त्याने (औरंगजेब) केवळ चांगलीच कामं केली होती. त्याने देश तोडण्याचं काम केलं होतं. त्यामुळे औरंगजेब (Aurangzeb) हा महान असू शकत नाही. त्याची कबर तशीच ठेवण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे ज्या कोणाचं औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असेल त्याने त्याच्या घरातच त्याची कबर बांधून घ्यावी.” (Dhirendra Krishna Shastri)
अलीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शिक ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांटची पसंती मिळाली आहे. मात्र औरंगजेबाने (Aurangzeb) ज्या क्रूरतेने छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) हत्या केली होती, त्याचं चित्रणही या चित्रपटात करण्यात आलं आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहून लोकांचा औरंगजेबाबद्दलचा राग उफाळून आला. त्यातच अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली. त्यामुळे राग अनावर होऊन लोकांनी कबर हटवण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलनही केलं. पाठोपाठ औरंगजेब प्रकरणावरून नागपुरात (Nagpur) दंगलही झाली. या सगळ्या घडामोडींमुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असतानाच आता धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. (Dhirendra Krishna Shastri)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community