वक्फ विधेयकावर Dhirendra Shastri यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सनातन धर्मासाठी… 

777
वक्फ विधेयकावर Dhirendra Shastri यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सनातन धर्मासाठी…
वक्फ विधेयकावर Dhirendra Shastri यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सनातन धर्मासाठी…
Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ ​​बाबा बागेश्वर (Baba Bageshwar Dhaam) यांनी भिवंडी येथे एका सभेला संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहे. संसदेत (Parliament) वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) मंजूर होणे हा सनातन धर्मासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. धीरेंद्र शास्त्रींनी याला सनातन धर्म (Sanatan Dharma) वाचवण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे म्हटले आहे. (Dhirendra Shastri)

(हेही वाचा – रामनवमीला भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री पुलाचे PM Narendra Modi करणार उद्घाटन; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्य?)

‘विधेयक मंजूर होणे ही सनातनींसाठी अभिमानाची गोष्ट आहे’
जनतेला संबोधित करताना शास्त्री म्हणाले की, ‘वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात २०० हून अधिक मते पडली हे देशाचे दुर्दैव आहे. वक्फ विधेयक मंजूर होणे ही सनातनींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच जेव्हा राम मंदिर (Ram temple) बांधण्याची चर्चा होती तेव्हा बरेच लोक म्हणायचे की त्या जमिनीवर रुग्णालय बांधले पाहिजे, शाळा बांधली पाहिजे, परंतु आजपर्यंत कोणीही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर रुग्णालय किंवा शाळा बांधली पाहिजे असे म्हणताना ऐकले नाही.

(हेही वाचा – LIC Jeevan Utsav : एलआयसीच्या जीवन उत्सव योजनेतून निवृत्तीनंतर मिळवा दरमहा १५,००० रु)

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी…
महाभारताचे (Mahabharata) उदाहरण देत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, ‘जमाव कौरवांच्या सोबत होता, पण पांडव जिंकले.’ काही लोक म्हणत होते की वक्फ विधेयकाविरुद्ध आमची मोठी एकजूट आहे आणि जर ते मंजूर झाले नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ. पण आम्ही म्हटलं होतं की विजय त्यांचाच आहे ज्यांच्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्ण पांडवांच्यासोबत आहेत. औरंगजेबाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, काही लोक त्यांना आठवत होते, पण आता त्यांचे नाव पुसण्याची व्यवस्था केली जात आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा दावाही बाबा बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.