७० पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स तोल गेल्याने उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात जिवीतहानी टळली असून एका चार वर्षीय मुलीच्या हाताला जबर दुखापत झाल्याची घटना घडल्याची देखील माहिती आहे. तर तब्बल वीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. नाशिकसह विभागात अपघाताचे सत्र सुरूच असून सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे (Accident) अनेकांना प्राणाला मुकावे लागत असल्याचे चित्र आहे.
पुण्याहून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील नरडाणा गावापासून काही अंतरावर तोल गेल्याने अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झालेल्या ट्रॅव्हल्समधील प्रवासींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात जिवीत हानी टळली असून एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली तर २० प्रवासी किरकोळ जखमी झाले घटनास्थळी महामार्ग पोलीसांकडून देखील मदतकार्य सुरु आहे.
(हेही वाचा : Bombay High Court : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला झापले; तर उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला नाकारले )
ट्रॅव्हल्समधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे सामान मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्सवर असल्याने एका वळणावर तोल गेल्याचे प्राथमिक माहिती आहे. जेव्हा ट्रॅव्हल्स उलटली तेव्हा मार्गावर वर्दळ नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र ट्रॅव्हल्स उलटल्याने ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची मोठी आरडाओरड झाली. तसेच रस्त्यावर ट्रॅव्हल्स उलटल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community