Dibrugarh Express Train Derail : उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात, रेल्वेचे 10-12 डब्बे रुळावरुन घसरले

185

उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात (Dibrugarh Express Train Derail) झाल्याचे समोर येत आहे. गोंडा येथे चंदीगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur ) डब्बे रुळावरुन घसरल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा Love Jihad : ऑटो-रिक्षात केला आंतरधर्मीय विवाह; सांगितले मशिदीत झाला; धर्मांतराचे रॅकेट सुरू आहे का? न्यायालयाने दिला आदेश)

डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झाले. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची (Dibrugarh Express Train Derail) दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.