गेल्या काही दिवसांपासून सामान्य जनता कोरोना महामारीने त्रस्त असताना महागाई सामान्य जनतेची पाठ सोडत नसल्याचे दिसतेय. देशभरात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झालेली नसताना आता घाऊक ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. ती म्हणजे डिझेलचे दर तब्बल २५ रुपयांनी महागले आहे.
डिझेलच्या किरकोळ विक्रीदरात बदल नाही
दरम्यान, घाऊक ग्राहकांसाठी होणाऱ्या डिझेलच्या विक्रीमध्ये प्रति लिटर तब्बल २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींत ४० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पेट्रोल पंपावरून होणाऱ्या डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही, असेही सांगितले जात आहे.
(हेही वाचा – पैसे नाहीत म्हणून सरकारने परीक्षाच केली रद्द!)
… म्हणून घेण्यात आला निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात पेट्रोल पंपावरून होणाऱ्या विक्रीमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बस ताफ्यांचे मालक आणि मॉलसारख्या घाऊक ग्राहकांनी पेट्रोल पंपावरून डिझेलची खरेदी केली. सर्वसाधारणपणे ते पेट्रोल कंपन्यांकडून थेटपणे इंधन खरेदी करतात. त्यामुळे तेलाची किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांचे नुकसान वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका नायरा एनर्जी, जियो-बीपी आणि शेलसारख्या कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होत आहे.
मुंबई, दिल्लीत प्रति लीटर किती आहे दर?
तर मुंबईमध्ये घाऊक ग्राहकांसाठी डिझेलची किंमत वाढून १२२.०५ रुपये प्रति लीटर झाल्याची माहिती मिळतेय. पेट्रोल पंपांवर पेट्रोलची विक्री ही ९४.१४ रुपये दराने होत आहे. दिल्लीच्या पेट्रोल पंपांवर डिजेल ८६.६७ रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. तर घाऊक ग्राहकांसाठी त्याचा दर हा ११५ रुपये प्रति लिटर एवढा आहे.
Join Our WhatsApp Community