दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीने सामान्य जनतेचं बजेट कोलमडले आहे. पेट्रोलच्या दराने तर शंभर रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. पण आता मात्र महाराष्ट्रात डिझेलनेही शंभरी पार केली आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील परभणीमध्ये डिझेलने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
परभणीमध्ये डिझेलचा दर अधिक का
परभणीमध्ये डिझेलचा दर अधिक आहे कारण ते मनमाड डेपोतून येते. येथून मनमाड डेपोचे अंतर 340 किलोमीटरहूनही अधिक आहे, त्यामुळे डिझेलचा दर अधिक असल्याचे परभणी पेट्रोल डीलर्स अससोसिएशनचे अध्यक्ष अमूल भेडसूरकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. औरंगाबादमध्ये एक डेपो तयार करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर प्रति 2 रुपयाने कमी होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
( हेही वाचा :कैदी आता तुरुंगात राहून कुटुंब पोसणार )
29 मार्चच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 115.02 रुपये आणि डिझेल 99.23 रुपये, कोलकात्यात 109.66 रुपये आणि डिझेल 98.60 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 105.92 रुपये आणि डिझेलचा दर 95.98 रुपये प्रति लिटर झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या बाबतीत राजस्थानमधील गंगानगर अजूनही आघाडीवर आहे. मंगळवारी झालेल्या दरवाढीनंतर गंगानगरमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 117.14 रुपयांनी तर डिझेल 99.96 रुपयांनी महागले आहे.